यावल येथे बनावट दारुच्या कारखान्यावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 01:09 PM2018-03-28T13:09:10+5:302018-03-28T13:09:10+5:30

२१० लिटर रसायन, दारुच्या रिकाम्या बाटल्या व अन्य साहित्य जप्त

The yard on the fake liquor factory at Yaval | यावल येथे बनावट दारुच्या कारखान्यावर धाड

यावल येथे बनावट दारुच्या कारखान्यावर धाड

Next
ठळक मुद्देकारवाईने तालुक्यात खळबळसंशयीत ताब्यात

आॅनलाइन लोकमत
यावल, जि. जळगाव, दि. २८ - हरिओमनगरात सुरू असलेल्या बनावट दारुच्या कारखान्यावर पोलीस निरीक्षक डी. के परदेशी यांच्या पथकाने धाड टाकून २१० लिटर रसायन, दारुच्या रिकाम्या बाटल्या व अन्य साहित्य जप्त केले. या कारवाईने तालुक्यात खळबळ उडाली आहे. आकाश चोपडे असे संशयीत आरोपीचे नाव असून त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले. गेल्या अनेक दिवसांपासून चोपडे याचा हा गोरख धंदा सुरु होता.
पथकात स. फौ. सिकंदर तडवी, नागपाल भास्कर, पो. का. संजय तायडे, राजेश महाजन, राहुल चौधरी, संजय देवरे यांचा समावेश होता. दरम्यान उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक ए. बी. पवार, दुय्यम निरीक्षक इंगळे हेदेखूल पथकासह या ठिकाणी पोहचले.

Web Title: The yard on the fake liquor factory at Yaval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.