Gautami Patil Exclusive : कोण आहेत गौतमी पाटीलचे वडील, काय करतात? तिचे गावचे घर कसे आहे? अखेर शोधलेच...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 12:06 PM2023-05-31T12:06:06+5:302023-05-31T13:16:32+5:30

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात एकच नाव चर्चेत आहे. ते नाव म्हणजे गौतमी पाटील.

Who is Gautami Patil's father, what does he do? How is her village home? Finally found | Gautami Patil Exclusive : कोण आहेत गौतमी पाटीलचे वडील, काय करतात? तिचे गावचे घर कसे आहे? अखेर शोधलेच...

Gautami Patil Exclusive : कोण आहेत गौतमी पाटीलचे वडील, काय करतात? तिचे गावचे घर कसे आहे? अखेर शोधलेच...

googlenewsNext

प्रशांत भदाणे

जळगाव- गेल्या काही महिन्यांपासून राज्यात एकच नाव चर्चेत आहे. ते नाव म्हणजे गौतमी पाटील. तिच्या डान्समुळे ती राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचली, अनेकदा गौतमी पाटील वादाच्या भोवऱ्यात सापडली. अगोदर अश्लिल डान्सवरुन तिच्यावर आरोप करण्यात आले, तर काही दिवसापूर्वी गौतमीच्या नावावरुन वाद सुरू झाला. तिच खर नाव पाटील नसल्याचा दावा अनेकांनी केला. यावर स्वत: गौतमी पाटीलने (Gautami Patil) स्पष्टीकरण देत या वादाला पूर्णविरोम दिला. दरम्यान, अनेकांनी तिला पाठिंबाही दिला. आज लाईमलाईटमध्ये असलेल्या गौतमीचं, जळगाव जिल्ह्याशी खास कनेक्शन आहे. 

गौतमी पाटील अन् सुषमा अंधारे दोन्ही अ‍ॅक्टर, शिंदेंच्या आमदाराची बोचरी टीका

गौतमी पाटील (Gautami Patil) ही मुळची जळगाव जिल्ह्यातील आहे. तिच चोपडा तालुक्यात असलेलं वेळोदे नावाच हे गाव आहे. या गावात सध्या तिचे वडील रवींद्र बाबुराव नेरपगारे हे एकटेच राहतात. गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी गौतमीच्या वडिलांचं पत्र्याचं घर आहे. घरात अठरा विश्व दारिद्र्य असल्याचं परिसरातील लोकांनी सांगितलं. हाताला मिळेल ते मोलमजुरीचं काम करून गौतमीचे वडील आपला उदरनिर्वाह करतात. लग्नाच्या आधीपासूनच त्यांना दारूचं व्यसन होतं. लग्नानंतरही त्यांनी दारू पिणं सोडलं नाही. त्यामुळे घरात नवरा-बायकोत सतत भांडणं व्हायची.

गौतमीचा (Gautami Patil) जन्म झाला तेव्हाही तिच्या आईला हा त्रास सुरूच होता. शेवटी नवऱ्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून, गौतमीची आई सुनीताबाई तिला मामांकडे पुण्याला घेऊन आली. नंतर गौतमी मामांकडे वाढली. तिचं शिक्षणही पुण्यातच झालं. दरम्यानच्या काळात गौतमीच्या मामांनी तिच्या वडलांना पुण्यात आणलं. एका खासगी बँकेत सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीलाही लावलं. परंतु त्यांना दारूचे व्यसन असल्यामुळे ते पुण्यात न राहता गावाकडे परत आले. त्यानंतर मात्र गौतमीच्या आईने त्यांच्याशी कायमचे संबंध तोडले. पुढे जाऊन गौतमीच्या वडिलांचं दारूचं व्यसन आणखीनच वाढलं. म्हणून ते एकाकी जीवन जगत आहेत. सध्या वेळोदे गावात गौतमीचे कुणीही जवळचे नातेवाईक राहत नाहीत.

'बाप म्हणून मला स्वीकारावं'

यावेळी गौतमीचे (Gautami Patil) वडिल रवींद्र नेरपगारे म्हणाले, गौतमीने तिच्या अंगी असलेल्या कलेच्या जोरावर स्वतःचं नाव मोठं केलंय. त्याचा अभिमान आहे. तिच्याकडून मला पैशांची अपेक्षा नाही, पण तिने बाप म्हणून आपल्याला स्वीकारावं, अशी अपेक्षा आहे.

गावकऱ्यांना काय वाटतं? 

गौतमीचे वडिल हे सुरुवातीपासूनच तिच्या आईला त्रास देत होते. त्यांना दारूचं व्यसन असल्यामुळे कुटुंब उदध्वस्त झालं. ही कौटुंबीक पार्श्वभूमी गौतमीच्या यशाच्या आड येऊ नये, अशी प्रतिक्रिया गावातील नागरिकांनी दिली.

Web Title: Who is Gautami Patil's father, what does he do? How is her village home? Finally found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.