जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती विरोधात विश्वासदर्शक ठराव १४ विरुध्द 2 ने पारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 01:35 PM2017-11-03T13:35:09+5:302017-11-03T13:43:15+5:30

कृषी उत्पन्न बाजार समितीत संचालकांनी सभापती प्रकाश नारखेडे विरोधात दाखल केलेल्या अविश्वास ठराव शिवसेनेच्या बाजुने १४ विरुध्द २ असा पारीत झाला आहे.

The verdict of the verdict of Krúb, two against 14, changed | जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती विरोधात विश्वासदर्शक ठराव १४ विरुध्द 2 ने पारीत

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती विरोधात विश्वासदर्शक ठराव १४ विरुध्द 2 ने पारीत

googlenewsNext
ठळक मुद्दे लकी टेलर सभापती तर मनोहर पाटील बनणार उपसभापतीविश्वासदर्शक ठरावापूर्वीच सभापती नारखेडेंनी दिला राजीनामा भाजपाचे प्रभाकर सोनवणे गैरहजर

आॅनलाईन लोकमत

जळगाव, दि.३-कृषी उत्पन्न बाजार समितीत संचालकांनी सभापती प्रकाश नारखेडे विरोधात दाखल केलेल्या अविश्वास ठराव शिवसेनेच्या बाजुने १४ विरुध्द २ असा पारीत झाला आहे. त्यामुळे पुन्हा दोन वर्षांनंतर बाजार समितीवर शिवसेनेने आपला भगवा फडकाविला आहे. दरम्यान, विश्वासदर्शक ठरावाआधीच सभापतींनी जिल्हा उपनिंबधकांकडे राजीनामा सोपविला. शिवसेनेकडून लकी टेलर यांना सभापतीपद तर मनोहर पाटील यांना उपासभापती देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश नारखेडे यांनी दोन वर्षे होवून देखील  सभापतीपदाचा राजीनामा न दिल्याने शिवसेनेने त्यांच्या विरोधात विश्वासदर्शक ठराव आणण्याचा प्रस्ताव २३ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकाºयांकडे सादर केला होता. सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या तीन संचालकांनी देखील शिवसेनेला पाठींबा दिला होता. त्यानंतर झालेल्या घडोमाडीत भाजपाचे प्रविण भंगाळे यांनी सेनेला पाठींबा देत सेनेची संख्या १० वरुन १४ झाली होती. तर भाजपाची संख्या ३ वर आली होती. शुक्रवारी झालेल्या विश्वासदर्शक ठरावाला भाजपाचे प्रभाकर सोनवणे गैरहजर राहिल्याने भाजपाच्या बाजुला केवळ २ मते मिळाली.

सभापतींच्या राजीनाम्यानंतरही झाला विश्वासदर्शक ठराव
दरम्यान, शुक्रवारी विश्वासदर्शक ठराव मतदानाआधीच सकाळी १० वाजता प्रकाश नारखेडे यांनी जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर यांच्या कार्यालयात जावून, त्यांच्याकडे आपला राजीनामा सोपविला. त्यामुळे विश्वासदर्शक ठराव घेण्याबाबत जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समितीच्या संचाकलांना याबाबत कळवून विश्वास दर्शक ठराव मतदान घ्यायचे की नाही ? याबाबत विचारणा केली असता, सर्व संचालकांनी विश्वासदर्शक ठराव पारीत व्हावा अशी मागणी केल्यानंतर सकाळी ११ वाजता बाजार समितीत ठराव पारीत झाला.

Web Title: The verdict of the verdict of Krúb, two against 14, changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.