जळगावात स्कूल बस व दुचाकी अपघातात २ ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 05:35 PM2018-09-21T17:35:07+5:302018-09-21T17:38:46+5:30

जळगाव शहरापासून काही अंतरावर असलेल्या पाळधी गावानजीक राष्ट्रीय महामार्गावर स्कूल बस व दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी १ वाजता घडली.

Two killed in a school bus and a two-wheeler accident in Jalgaon | जळगावात स्कूल बस व दुचाकी अपघातात २ ठार

जळगावात स्कूल बस व दुचाकी अपघातात २ ठार

Next
ठळक मुद्देअपघातातील एकाची प्रकृती गंभीरराष्ट्रीय महामार्गावर झाला पुन्हा अपघातजखमींना तत्काळ जिल्हा रुग्णालयात केले दाखल

पाळधी, ता. धरणगाव : जळगाव शहरापासून काही अंतरावर असलेल्या पाळधी गावानजीक राष्ट्रीय महामार्गावर स्कूल बस व दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी १ वाजता घडली.
या अपघातात दिवाकर नारायण सोनवणे (वय ४५, रा.पिंप्राळा, जळगाव) व बन्सीलाल सुभाष राठोड (वय ३०, रा. हिसाळे, ता.शिरपूर, जि.धुळे) असे मयत झालेल्याची नावे आहेत. तर अर्जुन उत्तम पवार (रा.खडकेतांडा, ता.एरंडोल) हा गंभीर जखमी झाला. स्कूल बस व दुचाकी यांची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर आजूबाजूचे नागरिक व वाहनधारकांनी जखमींना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पाळधी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या अपघातामुळे काही वेळ वाहतुकीची कोंडी झाली.

Web Title: Two killed in a school bus and a two-wheeler accident in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.