जळगावात दुभाजकावर दुचाकी आदळल्याने तरुण अभियंता ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 12:21 PM2018-12-09T12:21:53+5:302018-12-09T12:22:17+5:30

डोक्याला गंभीर दुखापत

Tarun engineer killed in Bijapur accident | जळगावात दुभाजकावर दुचाकी आदळल्याने तरुण अभियंता ठार

जळगावात दुभाजकावर दुचाकी आदळल्याने तरुण अभियंता ठार

Next

जळगाव : रस्त्यावरील दुभाजकावर दुचाकी आदळल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन स्वप्नील देविदास पवार (वय ३४, रा.गायत्री नगर,जळगाव मुळ रा.भडगाव) हा तरुण अभियंता ठार झाल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री साडे बारा वाजता जळगावात घडली. या अपघात प्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
स्वप्नील पवार हा तरुण शुक्रवारी रात्री मित्राच्या संगणक दुरुस्तीच्या दुकानावर गेला होता. तेथून काम आटोपल्यानंतर रात्री १२.१५ वाजता दुकानातून दुचाकीने (क्र.एम.एच १९, बी.ए.२७०९) घरी यायला निघाला असता इंडिया गॅरेजजवळ दुचाकी दुभाजकावर आदळली. त्यात स्वप्नील दुचाकीसह कोसळला. यात डोक्याला मार लागला. जागेवरच रक्तस्त्राव होऊ लागल्याने त्याने मोबाईलवरुन आई सुनंदा यांना अपघाताची माहिती दिली. गस्तीवर असलेल्या पोलिसांना अपघाताचे दृष्य नजरेस पडले. त्यांनी क्षणाचा विलंब न करता तत्काळ खासगी दवाखान्यात दाखल केले, तेथे त्याचा श्वास थांबला. अपघाताचे कारण समजू शकले नाही.

Web Title: Tarun engineer killed in Bijapur accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.