चाळीसगाव येथे पुलावरुन रोडरोलर कोसळला, अवजड चाके निघळून अस्ताव्यस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 12:28 PM2017-12-31T12:28:58+5:302017-12-31T12:31:16+5:30

जीवितहानी टळली

The roadroller collapsed from the bridge in Chalisgaon | चाळीसगाव येथे पुलावरुन रोडरोलर कोसळला, अवजड चाके निघळून अस्ताव्यस्त

चाळीसगाव येथे पुलावरुन रोडरोलर कोसळला, अवजड चाके निघळून अस्ताव्यस्त

Next
ठळक मुद्दे बघ्यांची एकच गर्दी उसळली पुलाचे कठडे तोडून रोडरोलर खाली कोसळला.

ऑनलाईन लोकमत

चाळीसगाव, जळगाव, दि. 31-  धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चाळीसगाव येथे रविवारी सकाळी 9 वाजता रेल्वे पुलावरुन  रोडरोलर खाली कोसळला. यामध्ये त्याचे चाकेही निखळले.

रेल्वे पुलावरून हा रोल जात असताना अचानक पुलाचे कठडे तोडून तो खाली कोसळला. सुदैवाने आजूबाजूला कोणीही नसल्याने जीवितहानी टळली. रोडलरचे पुढचे व मागचे चाके निखळल्याने तो पुलाच्या खाली कोसळल्याचे सांगण्यात येत होते.  रोडरोलर कोसळल्यानंतर या ठिकाणी बघ्यांची एकच गर्दी उसळली होती.

Web Title: The roadroller collapsed from the bridge in Chalisgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.