जळगाव-औरंगाबाद मार्गावर वाकोदनजीक ट्रक उलटल्याने वाहतूक ठप्प, वाहनांच्या रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 12:26 PM2018-06-22T12:26:01+5:302018-06-22T12:26:01+5:30

औरंगाबादकडे खुर्च्या घेवून जाणाऱ्या ट्रकला अपघात

Road traffic jam on Jalgaon-Aurangabad route | जळगाव-औरंगाबाद मार्गावर वाकोदनजीक ट्रक उलटल्याने वाहतूक ठप्प, वाहनांच्या रांगा

जळगाव-औरंगाबाद मार्गावर वाकोदनजीक ट्रक उलटल्याने वाहतूक ठप्प, वाहनांच्या रांगा

googlenewsNext
ठळक मुद्देतीन ते चार कि.मी. दुतर्फा वाहनाच्या रांगा चौपदरीकरणाचे काम सुरु असल्याने  मोठी तारांबळ

वाकोद, जि. जळगाव - जळगाव येथून प्लॅस्टिकच्या खुर्च्या घेऊन औरंगाबादकडे जात असलेला ट्रक (क्र. एम. एच. १९ झेड. ०७५१) उलटून झालेल्या अपघातात खुर्च्यांचे मोठे नुकसान झाले. हा अपघात जळगाव औरंगाबाद मार्ग क्र.१८६ वरील वाकोदगावाजवळ गुुरुवारी मध्यरात्री झाला. सकाळी वाहनांची गर्दी वाढत गेल्याने वाकोद पहूर रस्त्यावर तीन ते चार कि.मी. दुतर्फा वाहनाच्या रांगा लागलेल्या होत्या. सकाळी आठ वाजेपर्यंतदेखील घटना स्थळी पोलीस आलेले नसल्याने वाहनधारकांनी संताप व्यक्त करीत होते.
जळगाव औरंगाबाद महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरु असल्याने  मोठी तारांबळ होत होती.

Web Title: Road traffic jam on Jalgaon-Aurangabad route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.