मनपाचे आर्थिक ग्रहण सोडवावे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 12:19 PM2019-07-10T12:19:29+5:302019-07-10T12:19:58+5:30

गाळेधारक व त्यांच्याकडे थकलेले भाडे हा विषय महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट करणारा आहे़ आठ वर्षांपासून हा विषय प्रलंबित असल्याने ...

Resolve NCP's financials ... | मनपाचे आर्थिक ग्रहण सोडवावे...

मनपाचे आर्थिक ग्रहण सोडवावे...

Next

गाळेधारक व त्यांच्याकडे थकलेले भाडे हा विषय महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट करणारा आहे़ आठ वर्षांपासून हा विषय प्रलंबित असल्याने जळगावकरांसाठी मुलभूत सुविधा देताना प्रशासनाची कसरत होतांनाचे चित्र आहे़ अशा स्थितीत या सर्व गाळ्यांचे फेरमुल्यांकन होणे अत्यंत गरजेचे आहे़ चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी जळगावकर जनतेने महानगरपालिकेत सत्तांतर घडवून आणत भाजपच्या हाती एकहाती सत्ता दिली़ भाजपाने जळगावकरांना मोठ मोठी आश्वासने दिली होती़ ती आश्वासने पूर्ण होताना दिसत नाही़ मुलभूत सुविधांपासून आजही अनेक भाग वंचित आहेत़ अशा स्थितीत मुदत संपलेल्या गाळेधारकांचा प्रश्न सोडविलेला नाही. गाळ्यांचे भाडे आकारतांना प्रशासनाने सरसकट सर्वच गाळ्याचे सारखे मुल्यांकन करुन भाडे आकारले आहे. त्यामुळे गाळेधारक आठ वर्षापासून गाळ्यांच्या रक्कमा भरत नाहीत. ही थकबाकी वाढल्याने महापालिकेची आर्थिक परिस्थिती देखील बिकट झाली आहे. यामुळे जळगावकरांना मूलभूत सुविधा देतांना देखील प्रशासनाची कसरत होत आहे. गाळ्यांचे तेथील परिसर व त्यांचे व्यवसाय पाहून फेरमुल्यांकन करावे त्यानुसार बिलांचे वाटप करावे. त्यानंतर गाळेधारकांकडून भाड्याची वसुली करावी. जेणेकरुन मनपाला उत्पन्न मिळून आर्थिक परिस्थिती चांगली होईल. प्रशासनाने त्वरीत गाळेधारकांचा प्रश्न सोडवून वसुली करावी व नियमित कर भरणाऱ्या जळगावकरांना आवश्यक मूलभूत सुविधा पुरवाव्यात़ केवळ मुठभर गाळेधारकांसाठी संपूर्ण जळगावकरांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवू नये, हा प्रश्न मार्गी लावून आर्थिक ग्रहण सोडवावे
- रियाज बागवान, नगरसेवक

Web Title: Resolve NCP's financials ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव