वरणगाव आॅर्डनन्स फॅक्टरीत ९ एमएम बंदुकीच्या गोळीचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 06:57 PM2017-10-12T18:57:26+5:302017-10-12T19:01:11+5:30

वरणगाव आॅर्डनन्स फॅक्टरीचे सरव्यवस्थापक एस.चटर्जी यांनी दिली माहिती

Production of 9 mm gunshot in Varangaon Ordnance Factory | वरणगाव आॅर्डनन्स फॅक्टरीत ९ एमएम बंदुकीच्या गोळीचे उत्पादन

वरणगाव आॅर्डनन्स फॅक्टरीत ९ एमएम बंदुकीच्या गोळीचे उत्पादन

googlenewsNext
ठळक मुद्दे९ एम.एम.बंदुकीच्या गोळीची वाढली मागणी३०० ते ४०० तरुणांना मिळणार रोजगार२०१८ मध्ये प्रत्यक्ष उत्पादनास होणार सुरुवात

आॅनलाईन लोकमत
वरणगाव, ता.भुसावळ, दि.१२ : देशाच्या संरक्षणात महत्त्वाची भूमिका बजावणाºया वरणगाव येथील आॅर्डनन्स फॅक्टरीत लवकर ९ एम.एम.बंदुकीच्या गोळीचे उत्पादन करण्यास सरकार व आॅर्डनन्स फॅक्टरी बोर्डाने मंजुरी दिली आहे. २०१८ मध्ये प्रत्यक्ष उत्पादनास सुरुवात होणार असल्याची माहिती सरव्यवस्थापक एस.चटर्जी यांनी दिली.
दरम्यान, ९ एम.एम.बंदुकीच्या गोळीची मागणी वाढली आहे. आतापर्यंत या गोळीचे उत्पादन खडकी (पुणे) येथील गन फॅक्टरीत होत होते. मागणी वाढल्याने उत्पादन कमी पडत आहे. ९ एम.एम.ची गोळी वरणगाव येथे उत्पादीत केली जाणार आहे. त्यामुळे ३०० ते ४०० तरुणांना रोजगार मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
फॅक्टरी प्रशासन वीज बचतीसाठी सौर ऊर्जा प्रकल्प स्वत:च उभारत आहे. त्याद्वारे रोज १.६५ किलोवॅट ऊर्जेची बचत केली जात आहे. २०१८ मध्ये पाच किलो वॅट वीज बचत सौर ऊर्जेमार्फत केली जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी अतिरिक्त सरव्यवस्थापक राजीव गुप्ता, सुरधा अधिकारी कर्नल निंबाळकर, शरद राव उपस्थित होते.

Web Title: Production of 9 mm gunshot in Varangaon Ordnance Factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.