चहार्डी येथे पिण्याच्या पाण्याची समस्या बनली गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 09:58 PM2019-07-19T21:58:55+5:302019-07-19T22:01:34+5:30

चोपडा तालुक्यातील चहार्डी येथे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई आहे. भर पावसाळ्यातही ग्रामस्थांना पिण्याचे पाणी पंधरा ते वीस दिवस मिळत नसल्याने भीषण टंचाई निर्माण झाली आहे.

The problem of drinking water at Chhurdi became serious | चहार्डी येथे पिण्याच्या पाण्याची समस्या बनली गंभीर

चहार्डी येथे पिण्याच्या पाण्याची समस्या बनली गंभीर

Next
ठळक मुद्देगाव तसे चांगले पण वेशीला टांगलेअनेक पुरस्कार प्राप्त चहार्डी वाऱ्यावरगावकऱ्यांनी कारभार घेतला हातात

संजय सोनवणे
चोपडा, जि.जळगाव : तालुक्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने नंबर दोन असलेले चहार्डी हे गाव. गाव तसे खूप चांगले; पण सध्या मात्र वेशीला टांगले आहे. येथे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई आहे. भर पावसाळ्यातही ग्रामस्थांना पिण्याचे पाणी पंधरा ते वीस दिवस मिळत नसल्याने भीषण टंचाई निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे चहार्डी या गावाला गेल्या काही वर्षांपूर्वी अनेक वेगवेगळया पुरस्कारांनी गौरवलेले आहे. मात्र तरीही ही स्थिती निर्माण झाली आहे.
गेल्या तीन-चार वर्षांपासून नियोजनाचा, माहितीचा अभाव आणि संघटनाच्या अभावाने गावकºयांना पिण्याचे पाणी मिळू शकले नाही. गावकरी आपापल्या परिने जसे पिण्याचे पाणी उपलब्ध करता येईल त्या पद्धतीने करीत आहेत. भर पावसाळ्यातही या गावात पिण्याच्या पाण्याची ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीत सरपंचांसह १७ सदस्य निवडलेले आहेत. महिला सरपंच या कोणाला विश्वासात घेत नाहीत व इतर ग्रामपंचायत सदस्यांनी सुचवलेल्या कामांचा विचार होत नाही. म्हणून सदस्यांमध्ये गटबाजी निर्माण झाली आहे. मासिक सभा किंवा ग्रामसभा असते तेव्हा ग्रामपंचायत सदस्य मुद्दामहून गैरहजर राहतात. त्यामुळे सभा तहकूब होते. त्यानंतर आयोजित सभेला मात्र सर्वच ग्रामपंचायत सदस्य आवर्जून हजर असतात. सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या या गटबाजीत ग्रामस्थांचा मात्र रगडा होतोय.
सरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य हे एकमेकांवर आरोप खाजगीरित्या आपापसात हजार रुपये किंवा दीड हजार रुपये गोळा करून स्वतंत्र कूपनलिका खोदून त्या पद्धतीने पाणी उपलब्ध करीत आहेत. याचा फटका मात्र ग्रामपंचायतीला निश्चित बसणार आहे. कारण ग्रामस्थ स्वत: खर्च करून मूलभूत समस्या सोडवित आहेत त्या वेळेस मात्र त्यांच्याकडे असलेली घरपट्टी आणि पाणीपट्टी भरण्याचा प्रश्न निर्माण होऊन ऐरणीवर येणार आहे. म्हणून गाव तसे खूप चांगले आहे पण सध्या मात्र वेशीला टांगले आह,े अशी अनुभूती येत आहे. अनेक ग्रामस्थ असे बोलूनही दाखवित आहेत. एवढेच नाही तर गावातील वयोवृद्ध ग्रामस्थ ‘लोकमत’कडे धाव घेऊन सांगत आहेत की, पाण्याच्या समस्येबाबत आवाज उठवा आणि तुमच्या माध्यमातून गावकºयांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत होईल, अशी अपेक्षाही अनेक गावकºयांनी व्यक्त केली आहे.
ग्रामस्थ स्वत: सायकल, मोटारसायकल, टँकरने, बैलगाडीने, उपलब्ध होईल तेथून पिण्याचे पाणी व वापरण्यासाठी उपलब्ध करीत आहेत. मात्र ग्रामपंचायत सरपंच यांचा नियोजनाचा अभाव असल्याने सर्वांचे हालच हाल होत आहेत. गावाला पिण्याचा पाणीपुरवठा गावातीलच कूपनलिकांद्वारे केला जात होता. परंतु निम्म्यापेक्षा जास्त कूपनलिका जमिनीतील पाण्याची पातळी खोल गेल्याने बंद पडलेल्या आहेत. म्हणूनच पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे.
एवढेच नाही तर चहार्डीकडून निमगव्हाणकडे जाणाºया रस्त्यालगत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होण्यासाठी कूपनलिका खोदलेल्या आहेत. त्या कूपनलिकांमधील पंप दुरुस्तीसाठी बाहेर काढला असता कोणीतरी अज्ञात ग्रामस्थांकडून त्या कूपनलिकेत दगड टाकण्याचे किंवा अ‍ॅसिड टाकण्याचे प्रकार झाले आहेत म्हणून गावात मोठ्या प्रमाणात तेढ निर्माण झाली आहे. गटबाजीचे सध्या दर्शन होत आहे. त्यात मात्र ग्रामस्थांचा रगडा होत आहे. अखेर ग्रामस्थांचा दोनशे ते तीनशे घरे मिळून कूपनलिका खोदत आहेत आणि स्वत: पाणी उपलब्ध करीत आहेत.
गावाला मिळालेले पुरस्कार असे-
२००३/०४ साली संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय द्वितीय पुरस्कार (तीन लाख रुपये),
२००४ साली महात्मा फुले जलभूमी अभियान अंतर्गत प्रथम पुरस्कार,
२००७ साली यशवंत पंचायत राज अभियान अंतर्गत विभागीय पातळीचा द्वितीय पुरस्कार (२ लाख),
२००६/०७ साली महात्मा गांधी तंटामुक्त अभियान प्रथम पुरस्कार आणि विशेष शांतता पुरस्कार ( १० लाख + २.५ लाख)
२०१०/११ साली राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार (१० लाख),
२०११/१२ साली पंचायत सबलीकरण व उत्तरदायी अभियान अंतर्गत पुरस्कार (६ लाख), यशवंत पंचायत राज अभियान विभागीय पुरस्कार (३ लाख).

Web Title: The problem of drinking water at Chhurdi became serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.