जळगाव शहरात अवजड वाहनांवर पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 04:09 PM2018-04-01T16:09:01+5:302018-04-01T16:09:01+5:30

परवानगी नसताना रामानंद घाटातून जाणा-या चार अवजड वाहनांवर रामानंद नगर पोलिसांनी रविवारी कारवाई केली. त्यात एक डंपर व तीन ट्रॅक्टरचा समावेश आहे. अवजड वाहन बंदी कायदा कलमान्वये या वाहनांवर कारवाई करुन ती जप्त करण्यात आली. दरम्यान, या वाहनमालकांना न्यायालयात पाठविण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Police action against heavy vehicles in Jalgaon city | जळगाव शहरात अवजड वाहनांवर पोलिसांची कारवाई

जळगाव शहरात अवजड वाहनांवर पोलिसांची कारवाई

Next
ठळक मुद्दे तीन ट्रॅक्टर व एक डंपर जप्त रामानंद नगर पोलिसांची कारवाई मालकांना न्यायालयात पाठविणार

आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,१ : परवानगी नसताना रामानंद घाटातून जाणा-या चार अवजड वाहनांवर रामानंद नगर पोलिसांनी रविवारी कारवाई केली. त्यात एक डंपर व तीन ट्रॅक्टरचा समावेश आहे. अवजड वाहन बंदी कायदा कलमान्वये या वाहनांवर कारवाई करुन ती जप्त करण्यात आली. दरम्यान, या वाहनमालकांना न्यायालयात पाठविण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
रामानंद नगर घाटाजवळील म्युनिसिपल कॉलनीत गेल्या आठवड्यात वाळू वाहतूक करणाºया डंपरने दुचाकीस्वाराला उडविल्यानंतर रामानंद नगरचे पोलीस निरीक्षक बी.जी.रोहोम यांनी या घाटात पोलीस गस्त वाढवून अवजड वाहनांवर कारवाई सुरु केली आहे.या आठवडाभरातील ही तिसरी कारवाई आहे. राजेंद्र देवगीर गोसावी (रा.व्यंकटेश नगर, जळगाव) यांच्या मालकीचे डंपर क्र.एम.एच.१९ झेड ९९१२, किरण दिनेश कापडे (रा.ममुराबाद, ता. जळगाव) याच्याजवळील ट्रॅक्टर क्र.एम.एच.१९ बी.१४०७, दिलीप शांताराम तिवारी (रा.दिक्षितवाडी, जळगाव) याच्याजवळील ट्रॅक्टर क्र.एम.एच.१९ सी.४५५९ व किशोर एकनाथ रायसिंग (रा.कांचननगर, जळगाव) याच्याजवळील ट्रॅक्टर क्रं.एम.एच.१९ ए.पी.६७०२ ही चार वाहने जप्त करण्यात आली आहेत.

Web Title: Police action against heavy vehicles in Jalgaon city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.