जळगावात लवकरच पासपोर्ट कार्यालय

By admin | Published: April 23, 2017 12:07 PM2017-04-23T12:07:23+5:302017-04-23T12:07:23+5:30

जळगाव विमानतळावरून सप्टेंबर महिन्यापासून प्रवासी वाहतुकीला सुरुवात होवून जळगाव-दिल्ली, जळगाव-पुणे अशी सेवा सुरू होणार आहे

Passport office soon in Jalgaon | जळगावात लवकरच पासपोर्ट कार्यालय

जळगावात लवकरच पासपोर्ट कार्यालय

Next

ऑनलाइन लोकमत

पारोळा, जि. जळगाव, दि. 23 -  जळगाव विमानतळावरून सप्टेंबर महिन्यापासून प्रवासी वाहतुकीला सुरुवात होवून जळगाव-दिल्ली, जळगाव-पुणे अशी सेवा सुरू होणार आहे. त्या पाश्र्वभूमीवर जळगावला पासपोर्ट कार्यालय सुरू होणार असल्याची माहिती खासदार ए.टी.पाटील यांनी दिली.
 सद्दस्थितीत पासपोर्टसाठी नाशिक येथे जावे लागते.  या चकरा थांबून आता नाशिकऐवजी जळगाव येथे पासपोर्ट कार्यालयाला मंजुरी देण्यात आली आहे.  तसा पत्रव्यवहार परराष्ट्रमंत्री  सुषमा स्वराज यांनी केल्याची माहितीही खासदार पाटील यांनी दिली. या कार्यालयासाठी जळगाव शहरात जागा पाहण्याचे काम सुरू असून लवकरच कार्यालयाची उभारणी करीत पासपोर्ट सेवा सुरू होणार आहे.

Web Title: Passport office soon in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.