पारोळा तालुका टंचाई आढावा बैठकीत आमदारांनी धरले अधिकाऱ्यांना धारेवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 07:30 PM2018-04-07T19:30:00+5:302018-04-07T19:30:00+5:30

पारोळा येथे शनिवारी दुपारी आयोजीत तालुकास्तरीय पाणीटंचाई आढावा बैठकीत टँकर सुरु करण्यासह विहिर अधिग्रहण आदी प्रस्ताव महिन्याभरापासून पडून असल्याचे निदर्शनास आल्याने आमदार डॉ. सतीश पाटील यांनी अधिकारी वर्गाला धारेवर धरले.

 Parola taluka scarcity review meeting held by MLAs held by the MLAs! | पारोळा तालुका टंचाई आढावा बैठकीत आमदारांनी धरले अधिकाऱ्यांना धारेवर !

पारोळा तालुका टंचाई आढावा बैठकीत आमदारांनी धरले अधिकाऱ्यांना धारेवर !

Next
ठळक मुद्देपाणी टंचाई आढावा बैठकीत सरपंचांनी वाचला समस्यांचा पाढातक्रारीनंतर आमदारांनी केल्या कारवाईच्या सूचनागिरणेचे पाणी बोरीत टाकण्याला उशीर झाला तर रस्ता रोको व जेल भरोचा इशारा

आॅनलाईन लोकमत
पारोळा : तालुक्यात ५५ गावांना पाणी टंचाईच्या तीव्र झळा बसत असून त्यावर मात करण्यासाठी अनेक गावातून टँकरची मागणी होत आहे. तसेच विहीर अधिग्रहण, विहिरीला आडवे- उभे बोर करण्याबाबतचे प्रस्ताव सादर केले आहेत, तथापि काही प्रस्ताव पंचायत समितीस्तरावर व काही प्रस्ताव ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे एक एक महिन्यापासून पडून असल्याचे समजताच आमदार डॉ. सतीश पाटील यांनी शनिवारी येथे आयोजीत तालुकास्तरीय पाणीटंचाई आढावा बैठकीत सर्वच अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले.
तसेच अशा निष्क्रिय अधिकारी वर्गाला तालुक्यातून हलविल्याशिवाय तालुका पाणी टंचाईतून बाहेर निघणार नाही असेही त्यांनी बोलून दाखविले. दुपारी १ वाजता तहसील कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात आमदार डॉ. सतीश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पाणी टंचाई आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी एरंडोलचे प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, तहसीलदार पंकज पाटील , जि.प. सदस्य रोहन पाटील, हिंमत पाटील, उपसभापती अशोक पाटील, पं. स. सदस्य ज्ञानेश्वर पाटील, राजेंद्र पाटील, गटविकास अधिकारी आर.के. गिरासे, मुख्याधिकारी डॉ सचिन माने, माजी सभापती प्रकाश जाधव, मनोराज पाटील, बाळू पाटील, किशोर पाटील, पांडुरंग पाटील, नगरसेवक मनीष पाटील आदी उपस्थित होते.
सरपंचांनी मांडल्या समस्या
या वेळी आमदार पाटील यांनी गावनिहाय पाणीटंचाईची समस्या त्या गावांचे सरपंच आणि ग्रामसेवक यांच्याकडून जाणून घेतल्या.
बैठकीत सूचविले विविध उपाय
यावेळी तामसवाडीला तात्काळ पाणी पुरवठा योजना देण्यात यावी यासह ज्या गावात ३ दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे तेथे ४ किंवा ५ दिवसाआड पुरवठा करावा. पं. स. कार्यालयात टंचाई निवारण कक्षाची स्थापना करावी अशा सूचना गटविकास अधिकारी गिरासे यांना केल्या. बोरी धरणात मृतसाठा शिल्लक आहे, शहरासह अनेक गावांची पाणी पुरवठा योजना येथून आहेत. उन्हाळ्याचे अजून पुढील तीन महिने काढायचे आहेत. अधिकारी वर्गाने वस्तुनिष्ठ अहवाल जिल्हाधिकाºयांकडे सादर करावा म्हणजे गिरणेतून बोरी धरणात पाणी सोडले जाईल आणि पाणी टंचाईचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. जर गिरणेचे पाणी बोरीत टाकण्याच्या निर्णयास उशीर झाला तर तालुका होरपळून निघेल. लोकांना स्थलांतरित व्हावे लागेल. म्हणून सोमवारी दुपारी १२ वाजेपर्यंत गिरणेचे पाणी बोरीत टाकण्याचा निर्णय झाला नाही तर रास्ता रोकोसह जेलभरो आंदोलन केले जाईल असा इशारा आमदार डॉ. सतीश पाटील यांनी या बैठकीतून शासनाला दिला. या वेळी विविध विभागाचे अधिकारी, अभियंता, ग्रामसेवक व सरपंच उपस्थित होते.
तक्रारीनंतर कारवाईच्या सूचना
या वेळी अनेक गावातील ग्रामस्थांनी ग्रामसेवक गावात येत नाही, यामुळे अडचणी निर्माण होतात अशा तक्रारी केल्या तेव्हा टिटवी येथील ग्रामसेवक सावकारे यांची बदली करण्याबाबत ठराव सभेत मांडला गेला. तसेच ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे अभियंता सुधाकर पाटील व सहायक अभियंता धिरज पाटील यांनी कामात हलगर्जीपणा केला म्हणून त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठविण्याबाबत सूचना आ. डॉ. सतीश पाटील यांनी प्रांताधिकारी शर्मा यांना केल्यात.


 

Web Title:  Parola taluka scarcity review meeting held by MLAs held by the MLAs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.