एकच सुविधा केंद्र सुरु असल्याने विद्याथ्र्याचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 01:05 PM2017-07-31T13:05:00+5:302017-07-31T13:06:12+5:30

अभियांत्रिकीच्या दुस:या वर्षीच्या प्रवेशासाठी विद्याथ्र्याचा गोंधळ : प्रवेशनिश्चितीची आज शेवटची मुदत

As the only facility center is being opened | एकच सुविधा केंद्र सुरु असल्याने विद्याथ्र्याचे हाल

एकच सुविधा केंद्र सुरु असल्याने विद्याथ्र्याचे हाल

Next
ठळक मुद्देविद्याथ्र्यांचा गोंधळएकच सुविधा केंद्र सुरुदीड तास उशीराने उघडले सुविधा केंद्र

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 31 - अभियांत्रिकीच्या व्दितीय वर्षाच्या प्रवेशासाठी विद्याथ्र्याची पहिली यादी शनिवारी जाहीर करण्यात आली. 31 जुलै प्रवेश निश्चितीसाठी शेवटची मुदत असल्याने रविवारी शहरातील सुविधा केंद्रात प्रवेश निश्चितीसाठी हजारो विद्याथ्र्यानी गर्दी केली होती. मात्र शासकीय अभियांत्रिकीव्यतिरीक्त इतर सुविधा केंद्र बंद असल्याने  विद्याथ्र्याना मोठय़ा प्रमाणात त्रास सहन करावा लागला. तसेच शासकीय अभियांत्रिकीत देखील तीनच कर्मचारी उपस्थित होते. त्यामुळे दिवसभर रांगेत उभे राहून देखील प्रवेशनिश्चित न झाल्याने अनेक विद्याथ्र्याना परत जावे लागले. 
तंत्रनिकेतनच्या तिस:या वर्षाचे निकाल जुलैच्या पहिल्या आठवडय़ात जाहीर झाल्यानंतर अभियांत्रिकीच्या व्दितीय वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला गेल्या आठवडय़ापासून सुरुवात झाली. 29 जुलै रोजी व्दितीय वर्षाच्या प्रवेशनिश्चितीसाठी विद्याथ्र्याची पहिली यादी जाहीर करण्यात आली. प्रवेशनिश्चितीसाठी शासनाकडून 31 जुलै ची मुदत देण्यात आली आहे. 29 रोजी यादी जाहीर करण्यात आल्याने पहिल्या दिवशी जिल्ह्यातील तीनशे विद्याथ्र्याचेच प्रवेश निश्चित होवू शकले. त्यामुळे विद्याथ्र्याची रविवारी गर्दी होणार हे निश्चित होते.
अभियांत्रिकी व्दितीय वर्ष प्रवेशासाठी जिल्ह्यात तीन सुविधा केंद्र निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये उमवीतील एक केंद्रासह, आयएमआर महाविद्यालय व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा समावेश करण्यात आला आहे. रविवारी विद्याथ्र्याची गर्दी होणार हे निश्चित असताना देखील केवळ शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील सुविधा केंद्र सुरु होते. यामुळे जिल्ह्यासह राज्यातील इतर जिल्ह्यातील हजारो विद्याथ्र्यानी एकाच कें द्रावर गर्दी केली होती. मात्र कर्मचा:यांची कमी असलेली संख्या व सव्र्हरच्या समस्या निर्माण होत असल्याने या ठिकाणी विद्याथ्र्याचे  मोठय़ा प्रमाणात हाल झाले. 
सकाळी विद्याथ्र्यानी आयएमआर  व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या केंद्रामध्ये गर्दी केली होती. मात्र ते केंद्र  बंद असल्याने  विद्याथ्र्यानी शासकीय  अभियांत्रिकीत गर्दी केली. मात्र सुविधा केंद्र सुरु करण्याची वेळ सकाळी 10 वाजेची  असताना तब्बल दीड तास म्हणजेच  सकाळी 11.30 वाजता सुविधा केंद्र उघडण्यात आले. विद्याथ्र्यानी या केंद्रात सकाळी 8 वाजेपासून हजेरी लावली होती. त्यामुळे विद्यार्थी पालकांनी अभियांत्रिकी  प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली.
एकाच वेळी हजारो विद्याथ्र्यांनी गर्दी केल्याने महाविद्यालयाकडून    मुख्य इमारतीचे गेट बंद केले होते. यामुळे टप्प्या-टप्प्यात विद्याथ्र्यांना प्रवेशनिश्चितीसाठी सोडण्यात येत होते. मात्र सुविधा केंद्रात देखील केवळ तीनच कर्मचारी उपस्थित असल्याने प्रवेशनिश्चितीची प्रक्रिया संथगतीने सुरु होती. यामुळे विद्याथ्र्यांना तब्बल चार ते पाच तास रांगेत उभे रहावे लागले. यामुळे या ठिकाणी विद्याथ्र्यांनी गोंधळ घातला होता. तर काही विद्याथ्र्यांची येथील सुरक्षा कर्मचा:यासोबत देखील वाद झाले. शासनाने प्रवेशनिश्चितीची मुदत वाढवावी अशी मागणी यावेळी विद्याथ्र्यांनी  केली. उमवितील सुविधा केंद्र बंद असल्याने उमवि प्रशासनाविरोधात देखील अनेक विद्याथ्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त  केली.

Web Title: As the only facility center is being opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.