समन्वयातून अडचणी सोडवून अधिकाधिक नाटय़ प्रयोग व्हावे, जळगावात स्थानिक रंगकर्मीशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 05:49 PM2018-01-24T17:49:03+5:302018-01-24T17:49:29+5:30

रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळातील सदस्यांची सकारात्मक भूमिका असल्याची ग्वाही

To make more dramatic experiments by solving problems | समन्वयातून अडचणी सोडवून अधिकाधिक नाटय़ प्रयोग व्हावे, जळगावात स्थानिक रंगकर्मीशी संवाद

समन्वयातून अडचणी सोडवून अधिकाधिक नाटय़ प्रयोग व्हावे, जळगावात स्थानिक रंगकर्मीशी संवाद

Next
ठळक मुद्देस्थानिक कलावंतांना संवादातून प्रोत्साहनकलावांतांनी मांडल्या अनेक सूचना

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 24- नाटक, नाटय़कर्मी यांच्यासाठी रंगभूमी प्रयोग परीनिरीक्षण मंडळाची सकारात्मक भूमिका असून याद्वारे कोणाचीही अडवणूक होऊ नये तर येणा:या अडचणी समन्वयातून सोडविल्या जाव्यात व अधिकाधिक नाटकांचे प्रयोग व्हावे हाच दृष्टीकोन मंडळाचा असल्याचा आहे, अशी ग्वाही रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळातील (सेन्सार बोर्ड) पदाधिका:यांनी स्थानिक रंगकर्मीशी संवाद साधताना दिली.
रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे पदाधिकारी (सेन्सार बोर्ड) व जळगाव जिल्ह्यातील रंगकर्मीच्या संवादाचे आयोजन बुधवारी सकाळी  मू.जे. महाविद्यालयात आयोजन करण्यात आले होते.  त्या वेळी पदाधिका:यांमधून हा सूर उमटला. 
या वेळी  मंडळाचे अध्यक्ष अरुण नलावडे, सदस्य अशोक समेळ, गिरीश दाबके, प्रवीण कुळकर्णी, रमेश थोरात, चंद्रकांत शिंदे, गिरीश भूतकर, डॉ. दयानंद नाईक, मिलिंद टोकेकर, मानसी मागोकर, गीतांजली ठाकरे, आनंद देशपांडे, स्मिता भोगळे, कार्यालयीन सचिव संतोष  खामकर,प्राचार्य डॉ.उदय कुळकर्णी, प्रा.शरदचंद्र छापेकर, चंद्रकांत भंडारी, दिलीप वाघमारे, दत्तात्रय कुंभार, दिलीप साठे आदी  उपस्थित होते. 

समस्यांचे निराकरण
सेन्सॉर बोर्डाचे कामकाज कसे चालते, काय नियम आहे, नवीन कोणत्या बाबी मंडळात सुरू आहे इत्यादी विषयांवर या वेळी चर्चा करण्यात आली. तर स्थानिक कलावंतांकडून  समस्या मांडल्या आल्या व त्यांचे सदस्यांकडून निराकरण करण्यात आले. यावेळी दिग्दर्शक, लेखक, कलावंतांची उपस्थिती होती.

 प्रयोगांना तात्काळ परवानगी, मात्र संहितेचेही काटेकोर पालन
 मंडळ प्रयोगांना तात्काळ परवानगी देत आहे. एकांकीकांमधून नवीन तरुण पिढी नाटकाकडे वळली असल्याने काही अडचण आल्यास आम्ही ती संहीता वाचून लगेच त्यांना सांगतो. तंत्रज्ञानामुळे  मोबाईलवर सर्व माहिती उपलब्ध होते आणि सकारात्मतेने आम्ही ते घेऊन मुलांना प्रोत्साहनासाठी अधिक सुखकर कसे होईल या भावनेने काम करत असल्याचे या वेळी सदस्य प्रवीण कुळकर्णी यांनी सांगितले. तर जातीयवाद संहीतेतून पसरणार नाही ना, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही तर ‘बोल्ड’ विषय हाताळताना मयार्दाही उलटता कामा नये हेदेखील आम्ही तपासतो असे अशोक समेळ म्हणाले.

कलावांतांनी मांडल्या अनेक सूचना
वर्ष, सहा महिन्यात परीनिरीक्षण होणा:या नाटकांच्या लेखकांचा पत्ता, संपर्क क्रमांक वेबसाईटवर असावा, सध्या कोठेही मोठय़ा प्रमाणात एकांकिका सादर होतात त्यावर मंडळाचे नियंत्रण नाही का, तमाशातील वग, पथनाटय़ासाठी सेन्सारची काय भूमिका यासह विविध प्रश्न व समस्या कलावंतांनी मांडल्या. 

स्थानिक कलावंतांना संवादातून प्रोत्साहन
अनेक ठिकाणी चांगल्या प्रमाणात नाटय़चळवळ सुरु आहे. ही बाब लक्षात घेऊन अशा भागांमध्ये जाऊन तेथील कलावंतांशी संवाद साधत नाटय़ प्रयोगांसाठी प्रोत्साहन दिले जात असल्याचे अरुण नलावडे यांनी सांगितले. तसेच या भेटीतून मंडळाचे कार्य कसे चालते या विषयी माहिती देऊन स्थानिक कलावंतांच्या काय समस्या आहे हे जाणून घेतले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. सेन्सॉर बोर्ड म्हटले की अनेक गुंतागुतींचे भाग असतात ही गुंतागुंत थांबवून, सहकार्याची भावना ठेवून हा उपक्रम सुरू केला असून ऑनलाईनद्वारेही बोर्डाची माहिती जाणून घेता येऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. 

Web Title: To make more dramatic experiments by solving problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.