वर्डी येथे दीडशे पोती गव्हापासून बनविला बट्टीचा महाप्रसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 08:12 PM2018-03-03T20:12:14+5:302018-03-03T20:12:14+5:30

चोपडा तालुक्यातील वर्डी येथे शुक्रवारी सद्गुरू सुकनाथ बाबा यांच्या ८२ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजीत महाप्रसादात तब्बल दीडशे पोती गव्हापासून बट्टी बनविण्यात आल्या होत्या. त्यांना भाजण्यासाठी शेकडो हात पुढे आले होते. सोबत ३५ क्विंटल तूरदाळीपासून बनविलेले स्वादिष्ट वरण आणि ६० क्विंटल वांग्याच्या भाजीचा सुमारे पाच लाखावर भाविकांनी लाभ घेतला.

 Mahaprasad of the bartery made from one hundred and thirty gram of wheat at Verdi | वर्डी येथे दीडशे पोती गव्हापासून बनविला बट्टीचा महाप्रसाद

वर्डी येथे दीडशे पोती गव्हापासून बनविला बट्टीचा महाप्रसाद

Next
ठळक मुद्देदीडशे क्विंटल गव्हापासून बनविलेल्या बट्टींना सामूहिकरितीने आगीवर भाजलेभाविकांच्या स्वागतासाठी गावकरी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केली धावपळबस आगारातर्फे भाविकांसाठी जादा बसगाड्या

लोकमत आॅनलाईन
वर्डी ता. चोपडा, दि.३ : येथील ग्रामदैवत समजल्या जाणाºया श्री सद्गुरू सुकनाथ बाबा यांच्या ८२ व्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी आयोजीत महाभंडारा कार्यक्रमात पंचक्रोशीतील भाविकांनी दिलेल्या देणगीतून तब्बल दीडशे पोती गव्हापासून बट्ट्या बनविण्यात आल्या. राज्य आणि परराज्यातील भाविकांनी महाप्रसादरुपाने त्याचा लाभ घेतला. बट्ट्या भाजण्यासाठी शेकडो हातांची यावेळी मदत झाली.
सुकनाथ बाबा हे वर्डीत वास्तव्यास होते. त्यांनी गावकºयांसाठी शाळेसह अनेक सेवाभावी उपक्रम सुरू केले होते. ते वर्डी गावाला स्वत:ची कर्मभूमी समजत. १९३५ मध्ये त्यांनी समाधी घेवून त्यांच्या गादीचे वारस म्हणून रघुनाथ बाबा यांच्याकडे धुरा सोपवली. तेव्हा सातपुड्यातील आदिवासींकडून अगदी अल्प स्वरुपात घेतलेल्या धान्यापासून बनविलेल्या बट्टीने भंडाºयाची सुरूवात करण्यात आली. सलग ८२ वर्षांपासून भंडाºयाची परंपरा आजही वर्डीकरांनी जोपासली आहे. सुकनाथ बाबा यांच्या दरवर्षी येणाºया पुण्यतिथीला महाभंडारा केला जातो. यावेळी वरण- बट्टीचा महाप्रसाद केला जातो. आजच्या घडीला तब्बल १५० पोती गव्हापासून बट्ट्या बनविण्याचा लोकप्रिय प्रवास या सोहळ्याने गाठला आहे.
यंदा दोन दिवसापासून अहोरात्र परिश्रम घेत गावकºयांनी राज्यासह परराज्यातून आलेल्या सुमारे पाच सहा लाख भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते. या निमित्त परिसराला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. गावातील तसेच पंचक्रोषीतील विविध मान्यवरांनी जागोजागी भाविकांसाठी पाण्याची व्यवस्था केली होती. प्रत्येक जण आपापल्या परिने भाविकांसाठी मदत करीत होते. दीडशे पोती गव्हापासून बनविलेल्या बट्ट्या, ३५ ते ४० क्विंटल तुरदाळपासून वरण आणि सुमारे ६० क्विंटल वांग्याची भाजी बनविण्यात आली होती. दरम्यान, वर्डी गावातील वंदे मातरम् क्लबतर्फे संपूर्ण गावाची साफसफाई करण्यात आली. क्लबच्या सदस्यांनी गावातील तसेच मुख्य रस्त्यावरील केरकचरा वेचून जाळून टाकला. तसेच गावात घरांसमोर रांगोळ्या काढून सुशोभिकरण केले होते. रांगोळ्यांमध्ये जनजागृतीपर घोषवाक्ये, पर्यावरण संरक्षण घोषवाक्ये लिहून येणाºया भाविकांचे लक्ष वेधण्याचे कार्यर् देखील क्लबच्या सदस्यांतर्फे केले जात होते. रा.प.मंडळातर्फे जळगाव, यावल, चोपडा या आगारामार्फत जादा बसेसची व्यवस्था केली होती. तसेच उपआगाराची निर्मितीदेखील केली होती. त्याचप्रमाणे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.


 

Web Title:  Mahaprasad of the bartery made from one hundred and thirty gram of wheat at Verdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Chopdaचोपडा