लोकमत आॅन द व्हील्स : शेतकरी स्वावलंबी झाले तर प्रश्न सुटतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 12:57 PM2019-04-04T12:57:34+5:302019-04-04T12:59:50+5:30

धुळे ते तरवाडे 28 किमी

Lokmat Anne The Wheels: The question will be solved if the farmer becomes self-sufficient | लोकमत आॅन द व्हील्स : शेतकरी स्वावलंबी झाले तर प्रश्न सुटतील

लोकमत आॅन द व्हील्स : शेतकरी स्वावलंबी झाले तर प्रश्न सुटतील

Next

वसंत कुलकर्णी
धुळे : शेतकरी घाम गाळून शेतात अन्न धान्य पिकवतो. मात्र त्याला कवडीमोल भाव मिळतो. हमी भाव दिला तर सर्व अडचणी सुटतील शेतकऱ्यांना शेतीसाठी मुबलक पाणी व वीज व हमी भाव दिला तर कुठल्याच अनुदानाची त्याला गरज पडणार नाही, शेतकरी स्वावलंबी होईल. ज्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती उत्तम आहे त्यांना अनुदानाची रक्कम लवकर मिळते. मात्र जो शेतकरी मुळात गरीब आहे, ज्यांना अनुदानाची गरज आहे त्यांनाच ते मिळत नाही. यावर विचार होण्याची गरज असल्याची अपेक्षा शेतकरी संदीप पोतदार यांनी व्यक्त केली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ प्रतिनिधीने धुळे लोकसभा मतदारसंघातील धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघातील मतदारांशी धुळे-तरवाडे या बसप्रवासात संवाद साधला.
गरीब-श्रीमंतातील दरी वाढत असून गरीब जास्त गरीब तर श्रीमंत जास्त श्रीमंत होत असल्याचे दिपाली साळवे यांनी सांगितले. तर सवलती मिळाव्यात म्हणून आज अनेक नागरिक खोटे दाखले देऊन फायदे लाटतात़
मात्र ज्यांना खरी गरज आहे व पात्रही आहेत त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते, अशी व्यथा बसच्या वाहक विजया लोकरे यांनी व्यक्त केली.
आतापर्यंत केवळ आश्वासनांचा दिलासा दिला गेला. आता मात्र अपेक्षांची पूर्तता व्हावी, ही मागणी यावेळी प्रवासी मतदारांकडून करण्यात आली.
स्थानिक मुद्याला महत्व
नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नाही. स्वच्छतागृहे, गावात रस्ते नाही. हेच पूर्वापार चालत आलेले प्रश्न आहेत. आठ आठ दिवस पाणी मिळत नाही हे चित्र बदलण्याची आवश्यकता आहे.
भूगर्भातून पाण्याचा उपसा होतो. मात्र जलपुनर्भरणाचा विचारच कोणी करत नाही. तरुणांना रोजगार नाही. बेरोजगारी कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवे. त्यामुळे तरुणांमध्ये व्यसनाधिनता वाढत असल्याची कैफीयत भिकनराव भदाणेंनी मांडली.

Web Title: Lokmat Anne The Wheels: The question will be solved if the farmer becomes self-sufficient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव