जलयुक्त शिवार अभियानात लोहारा गाव विजेते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 05:22 PM2017-11-10T17:22:47+5:302017-11-10T17:29:54+5:30

जलयुक्त शिवार अभियानात अमळनेर तालुका विभागात पहिला

Lohara Village winners in Jalyukt Shivar | जलयुक्त शिवार अभियानात लोहारा गाव विजेते

जलयुक्त शिवार अभियानात लोहारा गाव विजेते

googlenewsNext
ठळक मुद्देपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्काराची घोषणा जलयुक्त शिवार अभियानात पाचोरा तालुक्यातील लोहारा जिल्हास्तरावर प्रथम विभागस्तरावर अमळनेर तालुक्याने मारली बाजी

आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.१० : मृद व जलसंधारण विभागातर्फे राबविण्यात येणाºया जलयुक्त शिवार अभियानात पाचोरा तालुक्यातील लोहारा जिल्हास्तरावर प्रथम आले आहे. विभागस्तरावर अमळनेर तालुक्याने बाजी मारली आहे.
मृद व जलसंधारण विभागातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्काराची घोषणा शासनातर्फे करण्यात आली. त्यात जिल्हास्तरावर प्रथम- लोहारा,ता.पाचोरा, द्वितीय- वाकडी,ता.चाळीसगाव, तृतीय : देऊळगाव, ता.जामनेर, उत्तेजनार्थ : वढोदा, ता.मुक्ताईनगर व उमाळे, ता.जळगाव.
विभागास्तरावर प्रथम : अमळनेर तालुका, द्वितीय : चाळीसगाव तालुका. जिल्हास्तरावरील पत्रकारितेत उत्कृष्ठ काम केल्याबद्दल प्रथम : सुधाकर पाटील, द्वितीय : विजय पाठक, उत्कृष्ठ काम केल्याबद्दल पुरस्कार प्राप्त अधिकारी/कर्मचारी प्रथम : मनोज घोडेपाटील (उपविभागीय अधिकारी), द्वितीय : श्रीकृष्ण हरचंद देवरे (कृषि सहाय्यक). विभागस्तरावर पुरस्कार प्राप्त तालुका द्वितीय : अमळनेर,जि.जळगाव, विभागस्तरावर पुरस्कार प्राप्त गाव द्वितीय : लोहारा, ता.पाचोरा.

Web Title: Lohara Village winners in Jalyukt Shivar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.