पणन महासंघाच्या खरेदी केंद्रांकडे कापूस उत्पादक शेतकºयांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 11:17 PM2017-10-26T23:17:47+5:302017-10-26T23:19:32+5:30

५ पैकी ३ केंद्रांचे उद्घाटन

Lesson of Cotton Growers Farmer to Marketing Centers at Marketing Society | पणन महासंघाच्या खरेदी केंद्रांकडे कापूस उत्पादक शेतकºयांची पाठ

पणन महासंघाच्या खरेदी केंद्रांकडे कापूस उत्पादक शेतकºयांची पाठ

Next
ठळक मुद्देभाव नसल्याने खाजगी व्यापाºयाकडे कलआॅनलाईन नोंदणीची किचकट प्रक्रियाजळगाव कृउबात उडीद-मूग खरेदी सुरू; मात्र प्रतिसाद नाही

आॅनलाईन लोकमत,
जळगाव दि.२६- राज्यभरात खाजगी जिनिंगमध्ये कापूस खरेदीस सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता पणन महासंघाकडून देखील लवकरच  जळगाव विभागात पणनकडून आठ केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील ५ केंद्रांपैकी ३ केंद्रांचे उद्घाटन गुरूवार,  २६ रोजी झाले. मात्र खाजगी व्यापाºयाच्या तुलनेत कमी भाव, आॅनलाईन नोंदणीची किचकट प्रक्रिया यामुळे शेतकºयांनी ‘पणन’च्या या खरेदी केंद्रांकडे पाठ फिरविली आहे.
महाराष्टÑ राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने जळगाव विभागात आठ कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी प्रक्रिया सुरु केली असून  जिनिंग व्यावसायिकांकडून  २३ आॅक्टोबरपर्यंत निविदा मागविण्यात आल्या होत्या. जळगाव जिल्ह्यात ५ ठिकाणी केंद्र प्रस्तावित होते. त्यापैकी साकळी ता.यावल, मुक्ताईनगर या दोन केंद्रांसाठी निविदाच प्राप्त झालेल्या नाहीत. तर पारोळा, अमळनेर व धरणगाव येथील खरेदी केंद्रांसाठी शेतकºयांची आॅनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली असून गुरूवार, २६ पासून खरेदी सुरू करण्यात आली. मात्र अमळनेरला केवळ ५ शेतकºयांची नोंदणी झाली असून पारोळा, धरणगाव येथे नोंदणीच झालेली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
किचकट प्रक्रिया, भाव नसल्याने पाठ
‘पणन’च्या केंद्रांवर बन्नी ब्रह्मा वाणाला ४३२० रूपये प्रति क्विंटल, एच ४एच ६ वाणाला ४२२० रूपये तर एलआर ५१६६ वाणाला ४१२० रूपये भाव जाहीर करण्यात आला आहे. त्या तुलनेत खाजगी व्यापारी सरासरी ४३०० ते ४५०० रूपये भाव देत आहेत. तसेच ‘पणन’च्या केंद्रावर कापूस देण्यासाठी आॅनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया शेतकºयांना किचकट वाटत असल्यानेही शेतकºयांनी या केंद्रांकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे.
सीसीआयच्या केंद्रांनाही प्रतिसाद नाही
ज्या तालुक्यात पणन महासंघाचे खरेदी केंद्र नाहीत अशा तालुक्यात सीसीआयकडून कापूस खरेदी सुरु करण्यात येणार आहे. खान्देशात १३ केंद्र असतील. जळगाव जिल्ह्यात जळगाव, भुसावळ, जामनेर, पहूर, शेंदुर्णी, पाचोरा, बोदवड, एरंडोल, चाळीसगाव या नऊ ठिकाणी केंद्र सुरु करण्यात येत आहेत. त्यापैकी काही केंद्र सुरू झाली आहेत. मात्र त्यासाठीही आॅनलाईन नोंदणीच असल्याने व भावही कमीच असल्याने शेतकºयांचा प्रतिसाद मिळालेला नाही.
जळगाव कृउबात उडीद-मूग खरेदी सुरू; मात्र प्रतिसाद नाही
 नाफेडचे उडीद व मूग खरेदी केंद्र अमळनेर, चोपडा व जळगाव येथे सुरू करण्यासाठी उत्पादक शेतकºयांची आॅनलाईन नोंदणी केली जात आहे. त्यापैकी अमळनेरला सुमारे १०० शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली असून सोमवार, दि.२३ रोजीच केंद्र सुरू करण्यात आले आहे. तेथे आतापर्यंत ८५ क्विंटल मालाची खरेदी झाली आहे. तर जळगावला गुरूवार, दि.२६ रोजी कृउबात केंद्र सुरू झाले. जळगावला बुधवारपर्यंत ६० शेतकºयांनी नोंदणी केली आहे. गुरूवारी हे केंद्र सुरू झाले. मात्र पहिल्या दिवशी नोंदणी केलेले शेतकरी फिरकलेच नाहीत. शुक्रवारी खरेदीस प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा कृउबातील सूत्रांनी व्यक्त केली. तर पाचोरा येथे आतापर्यंत १५-२० शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. हे केंद्र एक दोन दिवसांत सुरू होणार आहे.

Web Title: Lesson of Cotton Growers Farmer to Marketing Centers at Marketing Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.