ठळक मुद्देपरस्परविरोधी तक्रारसकाळी उफाळला वादगुन्हा दाखल नाही

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 13 -   चिमुकले राम मंदिरात पुजेचे साहित्य ठेवण्याच्या कारणावरुन सहायक फौजदार नामदेव बाबुराव ठाकरे, पोलीस कर्मचारी गोपीचंद पाटील व राजू देवराम शिंदे यांच्यात शनिवारी सकाळी साडे आठ वाजता मंदिराच्या आवारातच फ्री स्टाईल झाल्याची घटना घडली आहे. पाटील व शिंदे यांनी जीवे ठार मारण्याचा प्रय} केल्याचा आरोप ठाकरे यांनी केला आहे.
ठाकरे हे पोलीस मु्ख्यालयात कार्यरत आहेत. चिमुकले राममंदिरात ते दररोज सकाळी दर्शनासाठी जातात. नेहमीप्रमाणे ते शुक्रवारी दर्शनाला गेले असता तेथील ट्रस्टी पोलीस कर्मचारी गोपीचंद पाटील यांनी त्यांना पुजेचे साहित्य मंदिरात ठेऊन जायचे नाही असे सांगितले. त्यावरुन दोघांमध्ये शाब्दीक वाद झाला. रात्रपाळीला असलेल्या निंबा महाजन या कर्मचा:यानेही त्यांना ट्रस्टींचा तसा निरोप दिला. त्यामुळे ठाकरे यांनी साहित्य उचलून घेतले.
ठाकरे यांनी तक्रार दिल्यानंतर ट्रस्टी गोपीचंद पाटील यांनीही जिल्हा पेठ पोलिसांकडे ठाकरे यांच्याविरुध्द तक्रार अर्ज दिला आहे. राम मंदिरावर पोलीस कर्मचारी ट्रस्टी आहेत. ठाकरे हे सरकारी पेटी या मंदिरात ठेवतात व तिथेच अंघोळही करतात. त्यामुळे त्यांना विरोध केला असता त्यांनी शिवीगाळ करुन मारहाण करायला सुरुवात केली असे पाटील यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, दोघांचे अर्ज घेण्यात आले असले तरी गुन्हा दाखल झालेला नाही.

ठाकरे हे शनिवारी सकाळी पुन्हा मंदिरात गेले असता तेथे गोपीचंद पाटील व राजू शिंदे यांच्याशी त्यांचा वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की सर्व जण एकमेकाच्या अंगावर धावून गेले. पाटील व शिंदे या दोघांनी नरडी दाबून जीवे मारण्याचा प्रय} केल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. या वादानंतर जिल्हा पेठ पोलीस स्टेशन गाठून निरीक्षक सुनील गायकवाड यांच्याकडे फिर्यादच लिहून दिली, मात्र गायकवाड यांनी हा अदखलपात्र गुन्हा आहे असे सांगून हाकलून लावल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. अमळनेरच्या वादामुळे गायकवाड यांनी तक्रार घेतली नाही असाही आरोप त्यांनी केला.दरम्यान, ठाकरे हे जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहे.

ठाकरे यांची सरकारी पेटी मंदिरात होती, ती ठेवू नये म्हणून ट्रस्टींनी विरोध केला होता. दोघांचे एकमेकाच्याविरुध्द अर्ज आले आहेत. या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. पोलीस अधीक्षकांनाही त्याचा अहवाल पाठविणार आहे.               -सुनील गायकवाड, पोलीस निरीक्षक