जळगाव मनपा निवडणूक : २८ वर्षांपासून सोनवणे कुटुंबाचे प्रतिनिधीत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 12:44 PM2018-07-15T12:44:35+5:302018-07-15T12:45:55+5:30

पणजोबांपासून राजकारणाचा वारसा

Jalgaon Municipal Election: Representation of Sonawane family for 28 years | जळगाव मनपा निवडणूक : २८ वर्षांपासून सोनवणे कुटुंबाचे प्रतिनिधीत्व

जळगाव मनपा निवडणूक : २८ वर्षांपासून सोनवणे कुटुंबाचे प्रतिनिधीत्व

Next
ठळक मुद्देकैलास सोनवणे १९९१ पासून नगरसेवकभारती सोनवणे यांना उपमहापौरपदाचा मान

जळगाव : नगरपालिका व त्यानंतर महापालिकेवर सलग २८ वर्षांपासून कैलास सोनवणे व त्यांच्या कुटुंबाचे प्रतिनिधीत्व आहे. एवढेच नव्हे तर जळगावतालुक्यातील शेळगाव ग्रामपंचायतीचे सरपंचपद १९ वर्र्षेया कुटुंबाकडे होते.
कैलास सोनवणे यांच्या मातोश्रींचे आजोबा अर्जून फुलजी सोनवणे (अर्जून पैलवान) हे मूळचे रिधूरचे रहिवासी होते. त्यांनी जळगाव नगरपालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र ते पराभूत झाले. त्यांची मुलगी जयवंताबाई सोनवणे यादेखील नगरपालिका निवडणुकीत पराभूत झाल्या होत्या.कैलास सोनवणे यांनी महाविद्यालयीन निवडणुकांमध्ये सहभाग घेतला. मात्र त्यावेळी निवडणुकांवरून हाणामाऱ्या झाल्याने ती निवडणूकच रद्द झाली. नूतन मराठामहाविद्यालयातत एम.ए.च्या द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत असतानाच १९९१ साली त्यांनी नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला. त्या निवडणुकीत ते विजयी झाले.
तेव्हापासून आजपर्यंत सलग सहा वेळा निवडून आले आहेत. गेल्या २८ वर्षांपासून सलग नपा व आता मनपावर प्रतिनिधीत्व करीत आहेत. मागील निवडणुकीत शहर विकास आघाडी स्थापन करून त्यांनी निवडणूक लढविली. त्यांनी विरोधी पक्षनेता, गटनेता, पाणीपुरवठा सभापती, आरोग्य सभापती, स्थायी समिती सभापती, आस्थापना सभापती आदी विविध पदेही भूषविली आहेत. शेळगाव वि.का. सोसायटीवरही ते सदस्य आहेत.
भारती सोनवणे २००१ मध्ये पहिल्यांदा नगरपालिका निवडणूक जिंकल्या. त्यांचीही नगरसेवकपदाची सध्याची तिसरी टर्म आहे. कैलास सोनवणे यांच्या भाची सरिता सपकाळे यादेखील विद्यमान नगरसेविका आहेत. तर मावशी लीलाबाई सपकाळे यांनी स्वीकृत नगरसेवक म्हणून काम पाहिले आहे. यावेळी ते स्वीकृत नगरसेवक म्हणून महापालिकेत होते.
सोनवणे कुटुंबाचे जळगाव तालुक्यातील शेळगाव हे मूळ गाव. नारायण सोनवणे हे गावाच्या राजकारणात सक्रीय होते. १९९५ मध्ये त्यांची सरपंचपदी निवड झाली. तेव्हापासून सरपंचपद सोनवणे कुटुंबाकडेच आहे.
नारायण सोनवणे यांनी सुरेशदादांच्या विरोधात जिल्हा बँकेची निवडणूकही लढविली होती. अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत ते केवळ ३ मतांनी पराभूत झाले. त्यांचे पुत्र प्रल्हाद सोनवणे व अलका प्रल्हाद सोनवणे यांनी सरपंचपद भुषविले आहे. तर त्यांचा मुलगा जयदीप हादेखील शेळगाव वि.का.सोसायटीवर संचालक होता.
भारती सोनवणे यांना उपमहापौरपदाचा मान
कैलास सोनवणे यांनी शहर विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवून त्यांनी खान्देश विकास आघाडीसोबत मनपात सत्तेत सहभाग घेतला. त्यामुळे उपमहापौरपद त्यांच्या आघाडीकडे आले. कैलास सोनवणे यांच्या पत्नी भारती सोनवणे यांनी उपमहापौरपद भूषविले.

Web Title: Jalgaon Municipal Election: Representation of Sonawane family for 28 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.