डाळीची विल्हेवाट लावणारा सूत्रधार जळगाव पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 02:30 PM2018-05-19T14:30:22+5:302018-05-19T14:30:22+5:30

Jalalgaon police founder of the dish was found in the trap | डाळीची विल्हेवाट लावणारा सूत्रधार जळगाव पोलिसांच्या जाळ्यात

डाळीची विल्हेवाट लावणारा सूत्रधार जळगाव पोलिसांच्या जाळ्यात

Next
ठळक मुद्देवाशी येथून केली संशयिताला अटक१४ उद्योजकांना घातला दीड कोटींचा गंडान्यायालयाने सुनावली संशयितास पोलीस कोठडी

आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.१९- शहरातील १४ डाळ उद्योजकांना दीड कोटी रुपयात गंडा घालणाऱ्या राकेश उर्फ विशाल प्रफुल्ल ठक्कर (वय २९, रा.भूज, जि.कच्छ, गुजरात) याला एमआयडीसी पोलिसांनी नवी मुंबईमधील वाशी येथून अटक केली. दरम्यान, न्यायालयाने त्याला २२ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राकेश याने डाळींची परस्पर विल्हेवाट लावली आहे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, राकेश याने व्यापारी सांगून जळगाव एमआयडीसीतील उद्योजकांकडून डाळ मागविली होती. ही डाळ घेतल्यानंतर संबंधित व्यापाºयांना न देता त्याची परस्पर विल्हेवाट लावल्याचा प्रकार उघडकीस आला होता. डाळ उद्योजक रोहन रमेश प्रभुदेसाई (रा.विवेकानंद नगर, जळगाव) यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक अनिरुध्द अढाव यांनी देविदास सुरदास व परिष जाधव यांचे एक पथक संशयिताच्या शोधार्थ पाठविले होते. या पथकाने गुरुवारी रात्री राकेश याला जळगावात आणले. सहायक फौजदार अतुुल वंजारी या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
या नावाने मागविली डाळ
राकेश याचे अनेक कारनामे उघड झाले. त्याने संगम फुड, राजकोट व संगम फुड पुणे येथील व्यापारी नाथाभाई गालाभाई कोडीयातार, भावेश कोडीयातार (रा.पुणे), गुजरातचे प्रोप्रायटर राजू कोडीयातार, भावेन कोडीयातार व किशोर कोडीयातार (सर्व रा.राजकोट, गुजरात) यांच्याकरीता डाळी मागविली. मार्केटमध्ये विक्रीही झाली, परंतु व्यापाºयांना पैसेच मिळाले नाहीत.
या व्यापाºयांची केली फसवणूक
एमआयडीसीतील ऋषभ पल्सेस, भगीरथ उद्योग, विनय अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज, पुष्पा पल्सेस, आदर्श इंडस्ट्रीज, श्री.जी. कार्पोरेशन, शांतीनाथ इम्पेक्स, राजलक्ष्मी इम्पेक्स, विजय उद्योग, निशा प्रोटीन्स, नवदुर्गा प्रोटीन्स, अभय कमोडीटी यांच्यासह सर्वोदय दालमिल (शिवाजी नगर, जळगाव), रतनलाल बद्रीलाल (शनी पेठ) यांची राकेश याने फसवणूक केली आहे.

Web Title: Jalalgaon police founder of the dish was found in the trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.