जळगावातील मतदानासाठी सुटी द्यावी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 07:40 PM2018-07-30T19:40:22+5:302018-07-30T19:43:16+5:30

मनपाच्या १ आॅगस्ट २०१८ रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानासाठी महानगरपालिका क्षेत्रात आस्थापनांनी सुटी द्यावी अथवा दोन तासांची संबंधित मतदारांना सवलत द्यावी, असा आदेश राज्य शासनाने काढला आहे.

Holidays will be required for Jalgaon voting | जळगावातील मतदानासाठी सुटी द्यावी लागणार

जळगावातील मतदानासाठी सुटी द्यावी लागणार

Next
ठळक मुद्देसुटी देणे शक्य नसल्यास दोन तासांची सवलत द्यावीमहापालिका आयुक्तांनी दिली माहितीमहापालिका क्षेत्रातील दुकाने व आस्थापना यांना सूचना

जळगाव : मनपाच्या १ आॅगस्ट २०१८ रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानासाठी महानगरपालिका क्षेत्रात आस्थापनांनी सुटी द्यावी अथवा दोन तासांची संबंधित मतदारांना सवलत द्यावी, असा आदेश राज्य शासनाने काढला आहे. याबाबतची माहिती महानगरपालिकेचे आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी चंद्रकांत डांगे यांनी सांगितले.
ते म्हणाले की, महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महानगरपालिका क्षेत्रातील दुकाने, आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, मॉल्स, रिटेलर्स इत्यादी आस्थापना यांना सूचना देण्यात आल्या आहेत. या आस्थापनांनी कामगारांना या दिवशी सुटी अथवा मतदानासाठी दोन तासांची सवलत द्यावी.

Web Title: Holidays will be required for Jalgaon voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.