ग्रा.पं. निवडणूक होणा:या गावांमध्ये चावडीवाचन नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 11:58 PM2017-09-29T23:58:53+5:302017-09-29T23:59:25+5:30

7 ऑक्टोंबर रोजी मतदान

G.P. Elections: There is no speech in these villages | ग्रा.पं. निवडणूक होणा:या गावांमध्ये चावडीवाचन नाही

ग्रा.पं. निवडणूक होणा:या गावांमध्ये चावडीवाचन नाही

googlenewsNext
ठळक मुद्दे कर्जमाफी अर्जांचे चावडीवाचनआचार संहिता लागू आहे

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 29 -  जिल्ह्यातील नोव्हेंबर-डिसेंबर 2017 दरम्यान मुदत संपणा:या ग्रामपंचायतीतंर्गत 7 ऑक्टोंबर रोजी मतदान होत असल्याने या गावांमध्ये कर्जमाफी अर्जांचे चावडीवाचन होणार नाही.
जिल्ह्यातील पाचोरा व मुक्ताईनगर तालुका वगळता जळगाव तालुक्यात-11, धरणगाव- 6, एरंडोल- 3, जामनेर-10, भुसावळ -6, यावल - 8, रावेर- 21, बोदवड- 5, चाळीसगाव- 14, भडगाव- 4, अमळनेर- 17, पारोळा- 9, चोपडा- 4, अशा एकूण 118 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून त्यासाठी  7 ऑक्टोंबर रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे आचार संहिता लागू आहे. 
त्यात आता श्री छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत भरण्यात आलेल्या कर्जमाफी अर्जांचे चावडीवाचन 1 ते 3 ऑक्टोंबर दरम्यान होणार आहे. मात्र हे वाचन ग्रामपंचायत निवडणूक होणा:या गावांमध्ये न करण्याविषयी निवडणूक आयोगाने कळविले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वरील 118 गावांमध्ये हे वाचन न होता ते निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर होणार असल्याचे सांगण्यात आले 
 उर्वरित  ग्रामपंचायती अंतर्गत 1 ते 3 ऑक्टोंबर दरम्यान शेतकरी कर्जमाफी अर्जांचे चावडीवाचन त्या-त्या ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेत तहसीलदार, तलाठी, मंडल अधिकारी, ग्रामसेवक, कोतवाल, तालुका निबंधक, विविध कार्यकारी सोसायटय़ांचे गटसचिव, तालुका निहाय नियुक्त करण्यात आलेल्या समितीतर्फे पात्र, तात्पुरते अपात्र व अपात्र   अर्जाचे वाचन करण्यात येणार आहे. 


ज्या गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक होत आहे, त्या गावांमध्ये कजर्माफी अर्जाचे चावडीवाचन  न करण्याचे निवडणूक आयोगाने कळविले आहे. त्यामुळे तेथे निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वाचन होईल. 
- अभिजित भांडे-पाटील, उपजिल्हाधिकारी, महसूल-प्रशासन. 

Web Title: G.P. Elections: There is no speech in these villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.