पाचोरा येथील गो.से. शाळेत बहरली रंगांची दुनिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 11:07 PM2019-01-06T23:07:17+5:302019-01-06T23:08:24+5:30

पाचोरा येथील गो.से. हायस्कूलमध्ये रांगोळी आणि चित्रकला प्रदर्शनाच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत रंगांच्या दुनियेची सफर केली.

Go to Pachora The world of colors in the school | पाचोरा येथील गो.से. शाळेत बहरली रंगांची दुनिया

पाचोरा येथील गो.से. शाळेत बहरली रंगांची दुनिया

Next
ठळक मुद्देरांगोळी व चित्रकला प्रदर्शनात अनेक विद्यार्थ्यांनी नोंदविला सहभागस्त्री-भ्रूणहत्येसारख्या सामाजिक विषयांसह विविध कलाकृतींचे सादरीकरण

पाचोरा, जि.जळगाव : येथील गो.से. हायस्कूलमध्ये रांगोळी आणि चित्रकला प्रदर्शनाच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत रंगांच्या दुनियेची सफर केली.
येथे नुकत्याच झालेल्या सांस्कृतिक महोत्सवानिमित्त आयोजित रांगोळी चित्रकला आणि हस्तकला प्रदर्शनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग नोंदवला. चित्रकला दालन आणि सहा वर्ग खोल्यांमधून विविधरंगी चित्रांची आणि रांगोळ्यांची दुनिया निर्माण केली.
स्त्री-भ्रूणहत्येसारख्या सामाजिक विषयांसह विविध कलाकृती रांगोळी आणि चित्रांच्या माध्यमातून साकारत विद्यार्थ्यांनी पालक आणि रसिकांची मने जिंकून घेतली. याचवेळी या ठिकाणी भरलेल्या हस्तकला प्रदर्शनात टाकाऊपासून टिकाऊ वस्तू व उपयुक्त वस्तू निर्माण करून विद्यार्थ्यांनी हस्तकला प्रदर्शनदेखील तितकेच लक्षवेधी निर्माण केले. या चित्रकला, रांगोळी आणि हस्तकला प्रदर्शनात उद्या त्यांनी निर्माण केलेले चित्र, रांगोळी आणि वस्तू मान्यवरांकडून प्रशंसा मिळवून गेले.
या प्रदर्शनाला संस्थेचे चेअरमन संजय वाघ, उपविभागीय पोलीस अधिकारी केशव पातोंड, गटशिक्षणाधिकारी विकास पाटील, प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम, व्हाईस चेअरमन व्ही. टी. जोशी, संचालक सतीश चौधरी, अर्जुनदास पंजाबी, वासुदेव महाजन देसी यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. या विद्यार्थ्यांना कलाशिक्षक सुनील भोसले सुबोध कांतायन, प्रमोद पाटील आणि ज्योती पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक एस.डी. पाटील यांनी हे चित्रप्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी खुले राहणार असल्याचे सांगितले.
या प्रदर्शनातील विजेते असे-
रांगोळी स्पर्धा- समीक्षा शिरसाठ, श्वेता आवरे, भूमी पाटील, चित्रकला स्पर्धा- मानसी काबरा, श्रुती शिंपी, हस्तकला- मिहीर शिंपी, समृद्धी जळतकर.

Web Title: Go to Pachora The world of colors in the school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.