मक्यातील गयभू‘दादा’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 10:27 PM2017-10-11T22:27:43+5:302017-10-11T22:29:44+5:30

Gaibhava daada 'in maize! | मक्यातील गयभू‘दादा’!

मक्यातील गयभू‘दादा’!

googlenewsNext
ठळक मुद्देआधुनिक तंत्रज्ञानाचा केला वापरफर्टिगेशन तंत्राने झाला फायदासिंचनावर मका लागवड


आॅनलाईन लोकमत, दि़ ११, जळगाव - आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एकलग्न, ता़ धरणगाव येथील गंगाधर पाटील (गयभूदादा) मुलाच्या मदतीने शेतीमध्ये मका पिकाचे विक्रमी उत्पादन घेत आहेत़ यासाठी ते ठिबक सिंचनातून फर्टिगेशन तंत्र वापरत आहेत़ तसेच पाण्याचा संतुलित वापर करीत आहेत़ मका हे तिन्ही हंगामात येणारे पीक आहे. राज्यात मका पिकाचे क्षेत्र दरवर्षी वाढत आहे. मक्याचा उपयोग पशुखाद्य, पोल्ट्री खाद्य, इथेनॉल, स्टार्च करण्यासाठी वाढत आहे. राज्यात मका प्रामुख्याने औरंगाबाद, जालना, जळगाव, धुळे, वाशिम, बुलडाणा, अकोला, अहमदनगर, नंदुरबार, परभणी, बीड, नांदेड जिल्ह्यांमध्ये घेतले जाते. बहुतांश मका खरीप हंगामात घेतला जाते. मात्र सिंचनाची व्यवस्था नसल्याने उत्पादकतेवर परिणाम दिसून येतो. रब्बी हंगामातील मका ठिबक सिंचन पद्धतीखाली घेतले जाते. उत्पादन जास्त मिळते.
ठिबक सिंचनाचा वापर केल्याने पिकांचे उत्पादन वाढते, पाण्याची बचत होते तसेच कमी पाण्यात, कमी विजेत, कमी वेळेत अधिक क्षेत्र लागवडीखाली आणता येते हे शेतकºयांच्या लक्षात आलेले आहे. त्यामुळेच शेतकरी ठिबक सिंचन तंत्राचा मोठ्या प्रमाणावर वापर करून लागले आहेत. पीकनिहीय प्रचार मोहीमसुद्धा राबवित आहेत़
ठिबक सिंचनवरील मका लागवडीआधी जमिनीची पूर्वमशागत करून रोटोव्हेटरने जमीन भुसभुशीत करून घेतली. नंतर ठिबक सिंचनाच्या इनलाईन नळ्या पसरवून घेतल्या. ठिबकच्या दोन नळ्यामध्ये अंतर ५ फूट ठेवले. मका लागवडीपूर्वी रासायनिक खतांचा बेसल डोस दिला.यात १०:२६:२६ ची एक बॅग, डी.ए.पी.ची एक बॅग, युरिया - २५ किलो, पोटॅश -२५ किलो, मॅग्नेशियम सल्फेट -१५ किलो, झिंक सल्फेट -५ किलो एकरी मातीमध्ये चांगले मिसळून दिले. मक्याच्या सुधारित वाणाच्या बियाण्याची टोकन पद्धतीने लागवड केली. ठिबकच्या नळीच्या दोन्ही बाजूस १५ से.मी. अंतरावर बियाणे लावले. म्हणजेच मक्याच्या दोन ओळीमध्ये ३० से.मी. अंतर ठेवले. व दोन मक्याच्या झाडामध्ये २० से.मी. अंतर ठेवले. सिंचनासाठी दादाकडे ३ विहिरी व १ बोअरवेल आहे. गिरणा नदीवर बांधलेल्या कांताई बंधाºयाच्या पाझराचा चांगला फायदा ह्या परिसरातील गावांमध्ये होत आहे, असे दादा आवर्जून सांगतात. ते आपल्या शेतीमध्ये ठिबक आणि स्प्रिंकलरचा वापर करतात. त्यांनी मक्यासाठी टर्बोस्लिम, २ ड्रिपरमधील अंतर ५० सेमी. आणि चार ली. प्रती तास ड्रीपरचा वापर केला. सिंचनासाठी विहिराचे पाणी असल्याने त्यांनी स्क्रिन फिल्टर बसविले आहे. विद्राव्य खते देण्यासाठी व्हेंच्युरी बसविली आहे. ठिबक सिंचनाने जमीन वाफसा अवस्थेत राहील एवढेच पाणी दिले. ठिबकवरील मक्याची उत्कृष्ट उगवण झाली. त्यानंतर ठिबकमधून पाण्यात विरघळणारी युरिया, १२:६१:०० पाढरा पोटॅश ठिबकमधून व्हेंच्युरीद्वारे दिली. सूक्ष्म अन्नद्रव्ये झिंक, बोरॉनसुद्धा दिले़ पीक तणविरहित ठेवले़
ठिबक वरील मका पिकाचे अर्थशास्त्र
जमिनीच्या पूर्वमशागती पासून ते मका काढणीपर्यंत गयभूदादांना ठिबकचा घसारा धरून एकरी २६२८० रुपये खर्च आला. मक्याचे उत्पादन एकरी ५३़४७ क्विंटल एवढे मिळाले. त्याची विक्री १४१५ रुपये प्रती क्विंटल दराने केली़ त्यापासून एकरी ७५६६० रुपये ढोबळ उत्पन्न मिळाले. त्यामधून मका लागवडीचा संपूर्ण खर्च वजा केल्यास ४९३८० रुपये एकरी निव्वळ नफा मिळाला. मोकाट सिंचनावरील मक्यापासून २३८३२ रुपये एकरी नफा झाला होता. कारण ठिबक सिंचनावरील मक्याचे उत्पादन अधिक मिळाल्याने निव्वळ नफाही जास्त मिळाला. ह्या वर्षी सोयाबीन पिकासाठी स्प्रिंकलर व ठिबकचा वापर केला आहे़ याच २८ एकर क्षेत्रावर ते पुन्हा संपूर्ण मका ठिबक सिंचनाखाली लागवड करणार आहे.
४मावा आणि अळीच्या नियंत्रणासाठी व बुरशीचे रोग येऊ नये म्हणून बुरशीनाशक आणि कीटकनाशक एकत्रित दोन फवारण्या केल्या. जमीन कायम वाफसा अवस्थेत राहील एवढेच पाणी ठिबकने दिले. ठिबकमधून खते दिल्यावर फक्त ५ ते १० मिनिटे पाणी दिले. गरजेएवढे पाणी व योग्य वेळी खते मिळाल्याने पिकाची वाढ जोमात झाली़ तर पाटपाण्यावरील मक्याची उंची थोडीशी कमी होती व उत्पादनही कमी आले़
गयभू दादांचे मनोगत
शेतकºयांनी मका पाटपाणी पद्धतीवर लागवडीपेक्षा ठिबक सिंचन पद्धतीवर लागवड करावी. ठिबकमुळे मका पिकास गरजेएवढेच पाणी देता येते. मक्याचे उत्पादन जास्त मिळते. पाणी वापरामध्ये जवळपास निम्मे ५० टक्के बचत होते. खेड्यामध्ये विजेचा मोठा प्रश्न आहे. कधी रात्री मिळते तर कधी दिवसा मिळते, भारनियमनाचा खूपच त्रास होतो. मजूर मिळत नाही, ठिबकमुळे कमी पाण्यात, कमी वेळेत, कमी विजेत जास्त क्षेत्र लागवड करता येते, सिंचन करता येते. ठिबकमुळे काहीच अडचण येत नाही. मक्याच्या सर्व झाडांना एक समान पाणी व एक समान खते ठिबकमधून देता येतात. त्यामुळे मक्याचे विक्रमी उत्पादन मिळते. त्यामुळे येणाºया रब्बी हंगामात शेतकºयांनी पाटपाणी/मोकाट सिंचन पद्धतीवर मक्याची लागवड न करता ठिबक सिंचन पद्धतीवर लागवड करून विक्रमी उत्पादन घ्यावे.
- गंगाधर पाटील, शेतकरी़



 

 

Web Title: Gaibhava daada 'in maize!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.