शेंदुर्णी नगराध्यक्षपदासाठी चौरंगी लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 05:48 PM2018-11-29T17:48:17+5:302018-11-29T17:51:25+5:30

शेंदुर्णी नगराध्यक्षपदासाठी चौरंगी लढत होत आहे. १७ नगरसेवकपदांसाठी एकूण ५३ उमेदवार रिंगणात आहेत.

Fourth round of elections to the shanderi city | शेंदुर्णी नगराध्यक्षपदासाठी चौरंगी लढत

शेंदुर्णी नगराध्यक्षपदासाठी चौरंगी लढत

Next
ठळक मुद्देउमेदवारांना अनुक्रमांक व चिन्हाचे उद्या वाटपनगरसेवकपदाच्या १७ जागांसाठी ५३ उमेदवारनिवडणूक विभागाने बैठकीत दिल्या विविध सुचना

शेंदुर्णी ता.जामनेर : नगरपंचायत निवडणुकीत गुरुवारी माघारीचा अंतिम दिवस असल्याने बंडोबांना थंड करण्यात पक्ष यशस्वी झाले. नगराध्यक्षपदासाठी चौरंगी लढत होत आहे. १७ नगरसेवकपदांसाठी एकूण ५३ उमेदवार रिंगणात आहेत. माघारीची मुदत झाल्यानंतर नगरपंचायत कार्यालयात निवडणूक मतदान केंद्र व मतमोजणी केंद्र निरीक्षक म्हणून आलेले अहमदनगरचे अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. सर्व राजकीय पक्षांचे नेते उमेदवार व पत्रकार यांची बैठक घेतली. निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील सहाय्यक निवडणूक राहुल पाटील, तहसीलदार नामदेव टिळेकर यांनी माहिती दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, मनसे आदी राजकीय पक्ष वगळता अपक्ष उमेदवारांना चिन्ह व अनुक्रमांकाचे वाटप शुक्रवारी होणार आहे. सायंकाळपर्यंत चाललेले बैठकीत सर्व राजकीय नेत्यांनी उमेदवारांनी विविध प्रश्न विचारले. प्रचार सभा घेण्याची जागा राजकीय पक्षांचे नेते एकत्र येऊन निवडणूक अधिकारांना कळवणार असे सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी मतदान केंद्र परिसरातील जागेत मोबाईलची रेंज बंद करण्यात यावी अशी मागणी केली तसेच पत्रक निवडणूक निरीक्षक अहमदनगरचे अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांच्याकडे दिले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गरुड, सागरमल जैन, शांताराम गुजर उपस्थित होते.

Web Title: Fourth round of elections to the shanderi city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.