जळगावातील अयोध्या नगरात घरावर हल्ला करणा-या चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 03:56 PM2017-11-28T15:56:42+5:302017-11-28T16:00:20+5:30

फायनान्सद्वारे घेतलेल्या मोबाईलच्या हप्त्यातील शंभर रुपयासाठी ललित विकास चौधरी (रा.लिला पार्क, अयोध्या नगर, जळगाव) या तरुणाच्या घरावर हल्ला करणा-या प्रवीण चंद्रकांत वाघ, बग्गासिंग अच्छासिंग टाक (वय २२), प्रेमसिंग अय्यासिंग टाक (वय २०) व मोनूसिंग जगदीशसिंग टाक (वय १९) सर्व रा. तांबापुरा, या चौघांना मंगळवारी सकाळी अटक करण्यात आली तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले.

Four persons arrested in the attack in Jalgaon's Ayodhya town | जळगावातील अयोध्या नगरात घरावर हल्ला करणा-या चौघांना अटक

जळगावातील अयोध्या नगरात घरावर हल्ला करणा-या चौघांना अटक

Next
ठळक मुद्दे९ जण फरार १४ जणांविरुध्द गुन्हा दाखलजखमीची प्रकृती चिंताजनक


आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,२८  : फायनान्सद्वारे घेतलेल्या मोबाईलच्या हप्त्यातील शंभर रुपयासाठी ललित विकास चौधरी (रा.लिला पार्क, अयोध्या नगर, जळगाव) या तरुणाच्या घरावर हल्ला करणा-या प्रवीण चंद्रकांत वाघ, बग्गासिंग अच्छासिंग टाक (वय २२), प्रेमसिंग अय्यासिंग टाक (वय २०) व मोनूसिंग जगदीशसिंग टाक (वय १९) सर्व रा. तांबापुरा, या चौघांना मंगळवारी सकाळी अटक करण्यात आली तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले.
 मोबाईलच्या हप्त्यातील शंभर रुपयासाठी प्रवीण वाघ याने २५ ते ३० जणांना सोबत आणून ललित याच्या घरावर सोमवारी सायंकाळी सात वाजता हल्ला केला होता. या घटनेत मदतीसाठी आलेला राकेश प्रकाश नारखेडे (वय २३, रा.जुने जळगाव) व अभिषेक उर्फ सोनू किसन मराठे हे दोन जण गंभीर जखमी झाले आहे. या प्रकरणात १४ जणांविरुध्द कलम ३०७ चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडल्यानंतर पोलिसांनी रात्रीच धरपकड सत्र राबविले. पाच जण पोलिसांच्या हाती लागले तर अन्य जण फरार होण्यात यशस्वी झाले. दरम्यान, या हल्ल्यात जखमी झालेल्या अभिषेक याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत तर राकेश याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. सहायक पोलीस निरीक्षक समाधान पाटील व भरत लिंगायत यांनी जखमींचे जबाब नोंदविले आहेत.

Web Title: Four persons arrested in the attack in Jalgaon's Ayodhya town

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.