जळगावात बी.जे.मार्केट परिसरातील सट्टा अड्डावर धाड; 21 जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 12:22 PM2018-01-20T12:22:11+5:302018-01-20T12:24:09+5:30

17 मोबाईल व चार दुचाकी जप्त

The forage harbor in the in Jalgaon; 21 people arrested | जळगावात बी.जे.मार्केट परिसरातील सट्टा अड्डावर धाड; 21 जणांना अटक

जळगावात बी.जे.मार्केट परिसरातील सट्टा अड्डावर धाड; 21 जणांना अटक

Next
ठळक मुद्देरात्री 9.30 वाजता कारवाईसट्टेवाल्याने स्वत:च हलविली टपरी

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 20- बी.जे.मार्केट परिसरात शुक्रवारी रात्री सुरु असलेल्या सट्टा अड्डावर जिल्हापेठ पोलिसांनी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास धाड टाकून 21 जणांना अटक केलीे. तर 16 हजार 650 रुपयांची रोकड, 17 मोबाईल व चार दुचाकी जप्त केल्या आहेत. 
 शुक्रवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक धनंजय पाटील यांच्या पथकाने बी.जे.मार्केट परिसरातील सट्टा  अड्डावर धाड टाकली.  
काही जुगारींनी पळ काढण्याचा प्रय} केला. मात्र पोलिसांनी तत्काळ 21 जणांना अटक केली. तर काही घटनास्थळावरुन पळून जाण्यात यशस्वी झाले.   अटक करण्यात आलेल्यांची रात्री उशीरार्पयत चौकशी सुरु होती, संबधित अड्डा चालक व दुकान मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक धनंजय पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 
सट्टेवाल्याने स्वत:च हलविली टपरी
  राष्ट्रीय महामार्गावर अग्रवाल हॉस्पिटल चौक परिसरातील एका हॉटेलच्या मागे असलेल्या दोन टप:या सट्टेवाल्याने स्वत:हून हलविल्या. तर शहरात इच्छादेवी चौक, जुने बस स्टॅडच्या मागे आदी ठिकाणी सट्टा सुरुच होता. दरम्यान, माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी शहरात सुरु असलेल्या सट्टा-जुगारबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे.

Web Title: The forage harbor in the in Jalgaon; 21 people arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.