दीपनगर वीज निर्मिती केंद्रात अग्निशमन सेवा सप्ताह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 04:31 PM2019-04-24T16:31:53+5:302019-04-24T16:33:42+5:30

दीपनगर येथील वीज निर्मिती केंद्रांतर्गत अग्निशमन सेवा वीजनिर्मिती केंद्रात अग्निशमन सेवा सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. यात विविध कार्यक्रम घेण्यात आले.

Fire Service Week at Deepanagar Power Station | दीपनगर वीज निर्मिती केंद्रात अग्निशमन सेवा सप्ताह

दीपनगर वीज निर्मिती केंद्रात अग्निशमन सेवा सप्ताह

Next
ठळक मुद्देआठवडाभर विविध कार्यक्रम उत्साहातविविध उपक्रमांमध्ये कर्मचाऱ्यांसोबतच कुटुंबियांचाही सहभागस्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण

दीपनगर, ता.भुसावळ, जि.जळगाव : येथील वीज निर्मिती केंद्रांतर्गत अग्निशमन सेवा वीजनिर्मिती केंद्रात अग्निशमन सेवा सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. यात विविध कार्यक्रम घेण्यात आले.
मुख्य अभियंता पंकज सपाटे, उपमुख्य अभियंता नितीन पुणेकर, अधीक्षक अभियंता पेटकर अहिरेकर, रेड्डी, जाधव, देशकर, लोंढे यांनी शहीद स्मारकांवर पुष्प वाहून श्रद्धांजली अर्पण केली. अग्निशमन सप्ताहाचे महत्व कमलेश देशमुख यांनी सांगितले.
अधिकारी, कर्मचारी व वसाहतीतील महिलांसाठी घोषवाक्य व निबंध स्पर्धा मुला-मुलींकरीता चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. चित्रकला स्पर्धेत १५० मुला-मुलींनी सहभाग घेतला.
उपलब्ध अग्निशमन साधनांचा वापर करून आग विझवण्याच्या केलेल्या कार्याबद्दल तसेच महानिर्मिती कंपनीच्या होणाºया संभाव्य वित्तहानीचा बचाव केला त्याबद्दल त्यांना प्रोत्साहनपर पत्र देऊन गौरव करण्यात आले. अग्निशमन विभागातील दीपक पाटील यांना उल्लेखनीय कार्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी अग्निशमन अधिकारी कमलेश देशमुख यांनी परिश्रम घेतले. २१ रोजी फायर ड्रिल स्पर्धा घेण्यात आली. वसाहतीतील नागरिक, महिलांमध्ये अग्नी सुरक्षेसंबंधी जनजागृती व्हावी म्हणून अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांनी एलपीजी गॅसबाबत माहिती दिली व प्रात्यक्षिके दाखविले
सूत्रसंचालन कोळकर, अंभोरे रेहपाडे तर प्रास्ताविक देशमुख, केजी मेश्राम यांनी केले. कार्यक्रमास सर्व विभागप्रमुख कर्मचारी व कंत्राटी कामगार बहुसंख्येने उपस्थित होते.

Web Title: Fire Service Week at Deepanagar Power Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.