करारवर शेती घेतली, पतीवर चढला कर्जाचा डोंगर, पत्नीची आत्महत्या; जळगाव तालुक्यातील घटना 

By Ajay.patil | Published: February 1, 2024 06:43 PM2024-02-01T18:43:11+5:302024-02-01T18:43:22+5:30

जागृती अरुण कोळी (वय ३२) असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे.

Farming was taken on contract, the husband climbed the mountain of debt, the wife committed suicide | करारवर शेती घेतली, पतीवर चढला कर्जाचा डोंगर, पत्नीची आत्महत्या; जळगाव तालुक्यातील घटना 

करारवर शेती घेतली, पतीवर चढला कर्जाचा डोंगर, पत्नीची आत्महत्या; जळगाव तालुक्यातील घटना 

जळगाव: पतीने गावात करारवर शेती केली. मात्र, उत्पादन फारसे न आल्याने कर्जाचा डोंगर चढला. या विंवचतेनून पत्नीने विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना जळगाव तालुक्यातील डीकसाई येथे गुरुवारी घडली. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जागृती अरुण कोळी (वय ३२) असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. जागृती कोळी या आपले पती अरुण कोळी व पहिलीत असलेल्या मुलासोबत डीकसाई येथे वास्तव्यास होत्या. अरुण कोळी हे स्वत:जवळील शेतीसोबतच गावातील इतरांची शेती करारवर घेऊन करत होते. मात्र, यंदा पाऊस कमी झाल्यामुळे अरुण कोळी यांना उत्पादन कमी झाले. त्यात शेतीसाठी कर्ज घेतल्यामुळे आर्थिक अडचणी उभ्या राहिल्या. २५ जानेवारी रोजी जागृती कोळी या घरात आपल्या मुलासोबत असताना, जागृती यांनी विषप्राशन केले. 

आईला त्रास होत असल्याचे पाहून, लहान मुलगा ‘आईने विष घेतले’ असे म्हणत गल्लीत धावत सुटला. शेजारच्यांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर तातडीने जागृती कोळी यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. गेल्या आठवडाभरापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान जागृती कोळी यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Farming was taken on contract, the husband climbed the mountain of debt, the wife committed suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.