रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 11:31 AM2019-01-13T11:31:43+5:302019-01-13T11:33:22+5:30

आधारकार्डावरुन पटली ओळख तीन तासाने आढळला मृतदेह

Falling from the train, the youth dies | रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू

रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देनशिराबाद पोलिसांनी लावला शोध

जळगाव : गोवा निजामुद्दीन एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या अमितकुमार रामपारस पंडीत (२२,रा. चांदीबारी जि. राणी फुतर पूर्णिया,बिहार) हा तरुण बेपत्ता झाला होता. यानंतर भुसावळ रेल्वे पोलिसांनी तीन तासातच कडगाव रेल्वे पुलाजवळ तरुणाचा मृतदेह शोधला. खिशातील आधार कार्डच्या मदतीने मयत अमितकुमार हाच असल्याचे निष्पन्न झाले.
या संदर्भात सविस्तर असे की, १० रोजी अमितकुमार हा गोवा निजामुद्दीन एक्सप्रेसने गुरूवारी गोवा येथुन पाटणा येथे जात होतो. सोबत त्याचा सहकारी अशोककुमार सिंह होता. जळगाव स्टेशन सोडल्यानंतर अमितकुमार डब्यात नसल्याचे लक्षात आले.
नशिराबाद पोलिसांनी लावला शोध
सहायक पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांच्यासह हेकॉ. राजेंद्र साळुंखे, पोलीस नाईक गुलाब माळी यांना कडगाव पुलाजवळ तरूणाचा मृतदेह आढळला. मृतदेह सिव्हीलमध्ये आणून या घटनेची माहिती भुसावळ रेल्वे तसेच लोहमार्ग पोलिसांना दिली. पोलिसांनी अशोककुमार यास सिव्हीलमध्ये आणले. मयताजवळ सापडलेल्या आधार कार्डावरून हा तरूण अमितकुमार असल्याचे स्पष्ट झाले. अशोककुमार सिंह याने दिलेल्या नातेवाईकांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून घटनेची माहिती दिली. शुक्रवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास नातेवाईक आल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. नातेवाईकांनी जळगाव येथे मयतावर अंत्यविधी करण्याची ईच्छा पोलिसांजवळ व्यक्त केली. पंचनामा व कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर पोलिसांच्या मदतीने नातेवाईकांनी नेरीनाका स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार केले. या प्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
भुसावळ येथे थांबविली गाडी
भुसावळ येथे गाडी थांबल्यानंतर अशोक कुमार सिंह याने रेल्वे पोलिसांना ही माहिती दिली. रेल्वे पोलिसांनी जळगाव लोहमार्ग व नशिराबाद पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली.

Web Title: Falling from the train, the youth dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.