गुन्हा दाखल करण्याच्या धमकीनंतरही ठेवीदार लोकशाही दिनी उपस्थित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 10:45 PM2017-11-06T22:45:08+5:302017-11-06T22:49:48+5:30

स्वतंत्र बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावणार : जिल्हाधिकारी

even after threat of filing fir depositors present on Democracy Day | गुन्हा दाखल करण्याच्या धमकीनंतरही ठेवीदार लोकशाही दिनी उपस्थित

गुन्हा दाखल करण्याच्या धमकीनंतरही ठेवीदार लोकशाही दिनी उपस्थित

Next
ठळक मुद्दे कर्जमाफीच्या कामानंतर ठेवीदारांना प्राधान्यरक्कमा परत देण्यासाठी निश्चित धोरण ठरविणारदीपककुमार गुप्ता यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

आॅनलाईन लोकमत,
जळगाव, दि.६ - ‘लोकशाही दिनी’ तक्रार आणल्यास अटक करू अशी धमकी निवासी उपजिल्हाधिकाºयांमार्फत जिल्हाधिकाºयांनी दिल्याचा आरोप विवेक ठाकरे यांनी केला होता. या धमकीनंतरही ठेवीदार जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते. जिल्हाधिकाºयांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले व महिनाभरात ठेवीदार व सहकार अधिकाºयांच्या अधिकाºयांसोबत संयुक्त बैठक घेवून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. ठाकरे यांनी स्वत:च्या नावाने सर्व १७२ ठेवीदारांच्यावतीने ४ मुद्यांची एक स्वतंत्र तक्रार सादर करून जिल्हाधिकारी किशोर निंबाळकर यांच्यासमोर यावेळी कैफियत मांडली.
कर्जमाफीच्या कामानंतर ठेवीदारांना प्राधान्य
जिल्'ातील विविध पतसंस्थांमधील ठेवीदारांच्या प्रश्नांबाबत येत्या एक महिन्याच्या आत सहकार विभागाचे अधिकारी व ठेवीदारांचे प्रतिनिधी यांची स्वतंत्र बैठक घेऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी लोकशाही दिनी ठेवीदारांना दिले. जिल्हाधिकारी यांनी उपस्थितांना सांगितले की, सध्या जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांचेकडे शेतकरी कर्जमाफीचे काम सुरु आहे, ते काम लवकरच संपेल. त्यानंतर सहकार विभागाचे अधिकारी व ठेवीदारांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेण्यात येईल. या बैठकीत ठेवीदारांना त्यांच्या रक्कमा परत देण्यासाठी एक निश्चित धोरण ठरविण्यात येऊन पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी उपस्थितांना दिले.
...अन्यथा अधिकाºयांवर कारवाई
लोकशाही दिनी प्राप्त झालेल्या तक्रार अर्जांवर संबंधित विभागांच्या अधिकाºयांनी तातडीने कार्यवाही करुन तक्रारदारास न्याय द्यावा, अन्यथा संबधित अधिकाºयांवर कारवाई करावी लागेल. असा इशारा जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी संबंधित विभागाच्या अधिकाºयांना दिला. या लोकशाही दिनास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, उप वनसंरक्षक आदर्शकुमार रेड्डी, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके, उपविभागीय पोलीस अधिकारी (मुख्यालय) रशीद तडवी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांचेसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
एकूण ४२३ तक्रार अर्ज
आजच्या लोकशाही दिनात सहकार विभागाशी संबंधीत ठेवीदारांच्या २३९ तर इतर विविध विभागांविषयी एकूण १८० अर्ज प्राप्त झाले आहेत. दरम्यान,ठेवीदारांचे प्रश्नात लक्ष न घालण्याचा यापूर्वीचा पावित्रा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी बदलल्यामुळे सर्व ठेवीदारांनी समाधान व्यक्त केले. लोकशाही दिनातील तक्रारीची कारवाई पार पाडल्यानंतर सभागृहाबाहेर सर्व ठेवीदारांची विवेक ठाकरे यांनी द्वारसभा घेत ठेवीदारांना मार्गदर्शन केले. यावेळी पुढील पाठपुरावा व धोरण निश्चित करण्यात आले.

दीपककुमार गुप्ता यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

लोकशाही दिनी तक्रारी घेऊन आल्यास जेलमध्ये टाकण्याची धमकी जिल्हाधिकाºयांनी निवासी उपजिल्हाधिकाºयांमार्फत दिल्याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे टष्ट्वीटरद्वारे तक्रार केली आहे. सोबत ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचे कात्रणही जोडले आहे. धमकी देणाºया जिल्हाधिकाºयांना त्वरित हटविण्याची मागणी गुप्ता यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
तक्रारींचा वाचला पाढा             कु ल शब्द(279)

तक्रारींचा वाचला पाढा

दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन भवनाच्या सभागृहात लोकशाही दिनास सुरूवात झाली. जिल्हाधिकाºयांसह अधिकारी देखील उपस्थित होते. ठेवीदारांना विभाग निहाय बसविण्यात आले होते. जिल्हाधिकाºयांसह त्या-त्या विभागाचे अधिकाररी स्वत: लोकांच्या बाकाजवळ जाऊन तक्रारी जाणून घेत होते. यावेळी तक्रारदारांनी अधिकाºयांकडे तक्रारींचा पाढाच वाचला.

वृद्ध दाम्पत्याला रडू कोसळले
इंद्रप्रस्थ नगरातील पद्माकर व उषा डोल्हारे हे दाम्पत्य मनपाच्याच कामगाराकडून जिविताला धोका असल्याची तक्रार घेऊन आले होते. यापूर्वीही त्यांनी तक्रार दिली होती. त्यानंतर स्वत: जिल्हाधिकाºयांनी गणेशोत्सवाच्या काळात त्यांच्या घरी जाऊन पाहणी केली होती. मात्र संबंधीत कर्मचाºयाकडून मनपात खोटे खुलासे सादर केले. त्या कामगारावर कारवाई झालेली नसून त्याच्याकडून जिवाला धोका असल्याची तक्रार घेऊन हे दाम्पत्य सोमवार दि.६ रोजी पुन्हा लोकशाही दिनात आले होते. जिल्हाधिकाºयांनी त्यांची विचारपूस करताच या दाम्पत्याला गहिवरून आले. जिल्हाधिकाºयांनी यात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके हे देखील तक्रारदारांपर्यंत जाऊन तक्रारी ऐकून घेत होते. मोकळ्या जागेत खालीच बसलेल्या अपंग युवकाजवळ जाऊन खाली बसून त्यांनी त्याची तक्रार ऐकून घेतली. थोड्यावेळात जिल्हाधिकारीही तेथे आले. त्यांनीही तक्रार ऐकून घेत त्याबाबत सूचना केल्या.

तक्रारी करूनही दखल नाही
काही तक्रारदारांनी लोकशाही दिनात तसेच विभागीय लोकशाही दिनात दोन-दोन वेया तक्रारी करूनही दखल घेतली जात नसेल तर या ‘लोकशाही दिनाचा’ उपयोग काय? असा सवाल केला. पाचोरा तालुक्यातील सावखेडा बु. व सावखेडा  खुर्द या दोन्ही गावांसाठी बांधलेली स्मशानभूमी पाडून टाकून लोखंड चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखलच्या मागणीसाठी तसेच या सावखेडा बु. येथील गट नं.१२५स.नं.८८ गुरचरण क्षेत्रातील अतिक्रमणाबाबत रामचंद्र पाटील व ग्रामस्थांनी लोकशाही दिनी तक्रार करून व तीन वेळा स्मरणपत्र देऊनही कारवाई झालेली नाही. तसेच विभागीय लोकशाही दिनातही दोन वेळा तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याची व्यथा ‘लोकमत’ प्रतिनिधीजवळ मांडली. तर कंडारी येथे दलित वस्तीत झालेल्या रस्ते व भूमिगत गटारीसाठी प्राप्त निधीत १ लाख २० हजाराचा अपहार झाल्याची तक्रार देवानंद वानखेडे यांनी केली आहे. त्याचीही दखल घेतली जात नसल्याची तक्रार केली.

Web Title: even after threat of filing fir depositors present on Democracy Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.