513 ग्रा.पं.च्या पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 12:54 PM2017-08-02T12:54:22+5:302017-08-02T12:58:11+5:30

‘महावितरण’ची कारवाई : भर पावसाळ्यात नागरिकांचे हाल

Electricity supply to 513 of water supply scheme is divided | 513 ग्रा.पं.च्या पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित

513 ग्रा.पं.च्या पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित

Next
ठळक मुद्देभर पावसाळ्यात नागरिकांना  पाण्यासाठी वणवण भटकंतीवरणगाव नगर परिषदेकडे 1 कोटी 69 लाख रुपयांची महावितरणची थकबाकी पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडीत करण्याचा इशारा

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 2 - जिल्ह्यातील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांची 142 कोटींची थकबाकी आह़े अनेकदा नोटीस, सूचना देवूनही थकबाकी भरली जात नसल्याने महावितरण कंपनीने 15 तालुक्यांमधील 513  ग्रामपंचायतींचा सार्वजनिक पाणीपुरवठय़ाचा वीजपुरवठा खंडित केला आह़े त्यामुळे भर पावसाळ्यात नागरिकांना  पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ आली आह़े
महावितरण कंपनीचे औरंगाबाद प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरीया यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत मोठय़ा प्रमाणावर थकबाकीमुळे वीजबिल थकीत असलेल्या सर्व सार्वजनिक पाणीपुरवठा तसेच नगरपालिका पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश जळगाव परिमंडळाला दिले आहेत़ या आदेशाच्या पाश्र्वभूमिवर महावितरण कंपनीतर्फे ठिकठिकाणी कारवाईची मोहिम राबविण्यात येत आह़े
जिल्ह्यातील 15 तालुक्यांमधील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांची 142 कोटींची थकबाकी आह़े या थकबाकीमुळे 513 ग्रामंपचायतींच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आह़े वीजपुरवठा खंडीत केल्यानंतर त्या-त्या ग्रा़पं़तील पदाधिकारी लोकप्रतिनिधींची भेट घेतात़ त्यानुसार लोकप्रतिनिधींकडून महावितरणवर वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी दबाव आणला जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आह़े
महावितरणच्या कारवाईमुळे नाहक ग्रामस्थांना वणवण भटकण्याची वेळ आली आह़े याबाबत जिल्हा परिषदेतील ग्रा़पं़प्रशासन विभागाचे अधिकारी बोटे यांना विचारले असता, महावितरणची थकबाकी भरण्याची जबाबदारी त्या ग्रा़पं़ची आह़े त्यांना यासाठी थेट शासनाकडून निधी मिळतो़ अशी माहिती त्यांनी दिली़
वरणगाव नगर परिषदेकडे 1 कोटी 69 लाख रुपयांची महावितरणची थकबाकी आह़े वारंवार लेखी व तोंडी सूचना देवूनही थकबाकी भरली जात नसल्याने महावितरण कंपनीने मुख्याधिकारी यांना नोटीस दिली असून पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडीत करण्याचा इशारा दिला आह़े 

Web Title: Electricity supply to 513 of water supply scheme is divided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.