वरणगाव येथे डीवायएसपी देशमुख यांनी वाचविले बोकडाचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 09:45 PM2019-04-16T21:45:26+5:302019-04-16T21:47:14+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीचा जल्लोष, लगतच बोकड घेऊन जाणाºया खाटीक बांधवाजवळच्या बोकडाचे जोरजोरात ओरडणे सुरू असते, अशात मुक्ताईनगरचे नूतन उपविभागीय पोलीस अधिकारी संजय देशमुख यांचे लक्ष बोकड ओरडण्याकडे जाते. गर्दीत वाट करून ते खाटीक बांधवाजवळ जातात. प्राणीदयेने वर्दीतील माणूस जागा होतो, मोबदला देत त्या प्राण्यांची सुटका करतात. ही घटना आहे वरणगाव शहरातील. वर्दीतीलही माणुसकी यापुढे जात त्या प्राण्याला जीवदान देत, त्यापाठोपाठ त्याच्या काळजीसाठीही सरसावली

DySPSP Deshmukh saved the survival of Boalka in Varangaon | वरणगाव येथे डीवायएसपी देशमुख यांनी वाचविले बोकडाचे प्राण

वरणगाव येथे डीवायएसपी देशमुख यांनी वाचविले बोकडाचे प्राण

Next
ठळक मुद्देखाटीककडे जाणारे बोकड सोडविलेमोजली किंमत अन् देखभालीसाठी सोपविले पुजाऱ्याकडे

मतीन शेख
मुक्ताईनगर, जि.जळगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीचा जल्लोष, लगतच बोकड घेऊन जाणाºया खाटीक बांधवाजवळच्या बोकडाचे जोरजोरात ओरडणे सुरू असते, अशात मुक्ताईनगरचे नूतन उपविभागीय पोलीस अधिकारी संजय देशमुख यांचे लक्ष बोकड ओरडण्याकडे जाते. गर्दीत वाट करून ते खाटीक बांधवाजवळ जातात. प्राणीदयेने वर्दीतील माणूस जागा होतो, मोबदला देत त्या प्राण्यांची सुटका करतात. ही घटना आहे वरणगाव शहरातील. वर्दीतीलही माणुसकी यापुढे जात त्या प्राण्याला जीवदान देत, त्यापाठोपाठ त्याच्या काळजीसाठीही सरसावली आणि बोकड हरताळे जागृत हनुमान मंदिरावर पुजाºयाकडे सुपूर्द केले.
वरणगाव येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक सुरू असताना मुक्ताईनगरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय देशमुख बंदोबस्तासाठी हजर होते. यावेळी रस्त्याने मिरवणूक जात असताना एका ठिकाणी खाटीकने बोकड कापण्यासाठी घेतले. तेव्हा बोकड खूप ओरडत होता. तितक्यात देशमुख यांचे लक्ष त्या बोकडाजवळ गेले. लागलीच त्या खाटीकला थांब असे सांगितले व बोकडाची किंमत विचारली. मोबदला दिला व त्याला जीवदान दिले. मनात प्रश्न आला बोकड ठेवायचा कुठे? सुरक्षित राहू शकतो कुठे? तर जागा निवडली ती जागृत हनुमान मंदिर हरताळा फाटा येथे मंदिराचे पुजारी आझादगिरी यांच्याकडे सोपविण्यात आला व महाराजांनी त्याची पूजाअर्चा करून त्याचा सांभाळ करण्याची जबाबदारी मंदिर सेवाभावी समितीतर्फे घेण्यात आली.
डीवायएसपी देशमुख यांनी भूतदया जनावरांप्रति असलेले प्रेम, सहानुभूतीपूर्वक असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. यावेळी निंभोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वानखडे, प्रदीप काळे, पोहेकॉ अनिल चौधरी, पोकॉ विजय कचरे उपस्थित होते.

 

Web Title: DySPSP Deshmukh saved the survival of Boalka in Varangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.