अंजाळे घाटात एक्सल तुटल्याने मिनीडोअर दरीत कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 01:38 AM2018-09-25T01:38:32+5:302018-09-25T01:40:22+5:30

सात प्रवाशी तसेच चार लहान मुले थोडक्यात बचावली

Due to the axle loss in the Anjale Ghat, the minedar collapsed in the valley | अंजाळे घाटात एक्सल तुटल्याने मिनीडोअर दरीत कोसळली

अंजाळे घाटात एक्सल तुटल्याने मिनीडोअर दरीत कोसळली

Next
ठळक मुद्देवाहनात सात प्रवाशी व लहान चार लहान मुले होती.अपघातामुळे लहान मुले अपघाताने धास्तावली.वाहन उलटल्यावरही सर्व प्रवाशी दैव बलवत्तर म्हणून वाचले.

अंजाळे, ता.यावल, जि.जळगाव : अंजाळे गावाजवळ घाटाचा चढाव चढताना एक्सल तुटल्याने मिनीडोअर रिव्हर्स आल्याने रस्त्याच्या खाली दरीत उलटली. यातून सर्व सात प्रवासी व चार लहान मुले सुखरुप बचावले. ही घटना सोमवारी सकाळी १० वाजता घडली.
सूत्रांनुसार, भुसावळहून यावलकडे मिनिडोअर (एमएच-१९-जे-६०६८) प्रवासी घेऊन जात होती. ही गाडी अंजाळे गावालगत घाटात चढाव चढत असताना एक्सल तुटला. यामुळे मिनीडोअर रिव्हर्स झाली व दरीत उटलली. घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिक मदतीसाठी धावून आले. दरीत उलटलेल्या वाहनातून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. या घटनेतून सर्व सुखरूप बचावले. तथापि, वाहनचालक बाळू उर्फ गणेश राजाराम पाटील (रा.निमगाव) यांच्या पायाला मुका मार बसला आहे.
घटनास्थळी दरी व उंच चढाव असल्याने संरक्षक कठडे आवश्यक आहेत. आधीचे कडठे तुटून पडले आहते. सार्वजनिक बांधकाम विभागाने कठडे उभारल्यास अपघात होण्यास काहीसा अटकाव होईल.




 

Web Title: Due to the axle loss in the Anjale Ghat, the minedar collapsed in the valley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.