बसस्थानकावरून दोन पोत लांबवणाऱ्या धुळ्याच्या महिलेस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 11:21 PM2021-06-30T23:21:08+5:302021-06-30T23:22:34+5:30

एका महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र चोरून दुसरीच्या गळ्यातून सोन्याची पोत चोरताना धुळ्याच्या एका महिलेस रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

Dhule woman arrested for dragging two vessels from bus stand | बसस्थानकावरून दोन पोत लांबवणाऱ्या धुळ्याच्या महिलेस अटक

बसस्थानकावरून दोन पोत लांबवणाऱ्या धुळ्याच्या महिलेस अटक

Next
ठळक मुद्देमहिलेने रंगेहाथ पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : बसस्थानकावरून एका महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र चोरून दुसरीच्या गळ्यातून सोन्याची पोत चोरताना धुळ्याच्या एका महिलेस रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

३० रोजी सकाळी कल्पना प्रकाश तिसा ही महिला आपल्या मुलाला नाशिक बसमध्ये बसवत असताना एका महिलेने तिच्या गळ्यावर थाप मारून ४० हजार रुपये किमतीचे दोन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. कल्पना तिसा बसमध्ये चढत असताना एक महिला संशयित रित्या आजूबाजूला फिरत होती. म्हणून त्यांनी त्या महिलेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी सोनगीर बसमध्ये चढत असताना ज्योती दीपक पाटील या महिलेच्या गळ्यालादेखील थाप मारून तिच्या गळ्यातील पोत त्याच महिलेने लांबवण्याचा प्रयत्न केला असता ज्योतीने तिला रंगेहात पकडले आणि बसस्थानकावर असलेल्या हेडकॉन्स्टेबल निंबा पाटील यांच्या ताब्यात दिले. त्या महिलेने तिचे नाव उषाबाई नारायण रक्षे (एकता नगर, देवपूर, धुळे) असे सांगितले.

गेल्यावर्षीदेखील हेडकॉन्स्टेबल निंबा शिंदे यांनी तिला चोरी करताना पकडले होते. मात्र तिने पोत परत केल्याने महिलेने फिर्याद दिली नाही म्हणून तिला सोडून देण्यात आले होते. कल्पनाबाई तिसा यांनी उषाबाई रक्षे हिला ओळखले व पोत तिनेच चोरल्याची खात्री झाली. मात्र उषाबाईने पोत कोणाजवळ तरी लंपास केली होती. तिसा यांच्या फिर्यादीवरून उषाबाई विरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हेडकॉन्स्टेबल शिंदे यांनी तिला अटक केली आहे.

Web Title: Dhule woman arrested for dragging two vessels from bus stand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.