धुळे शिवसेना शहरप्रमुखासह दोन जणांना अटक, खंडणी आणि अपहाराचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 02:59 AM2018-06-14T02:59:31+5:302018-06-14T02:59:31+5:30

अमळनेर येथील उड्डाण पुलासाठी संपादित जमिनीपोटी वाढीव मोबदल्यासाठी कारस्थान रचणाऱ्या आणि ती रकम लाटण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या  टोळीला पोलिसांनी अटक केली आहे.

Dhule, Shiv Sena city president Arrested | धुळे शिवसेना शहरप्रमुखासह दोन जणांना अटक, खंडणी आणि अपहाराचा गुन्हा दाखल

धुळे शिवसेना शहरप्रमुखासह दोन जणांना अटक, खंडणी आणि अपहाराचा गुन्हा दाखल

Next

जळगाव - अमळनेर येथील उड्डाण पुलासाठी संपादित जमिनीपोटी वाढीव मोबदल्यासाठी कारस्थान रचणाऱ्या आणि ती रकम लाटण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या  टोळीला पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपींमध्ये धुळे शिवसेनेचे शहर प्रमुख सतीश महाले, धुळ्याचे माजी नगरसेवक विनायक शिंदे यांचा समावेश आहे.
बुधवारी सहा संशयितांची अमळनेर पोलिसांनी सात तास चौकशी केली. तसेच बँक अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचीही चौकशी झाली. सात तासांच्या चौकशीनंतर सर्वच संशयितांना घरी जाऊ देण्यात आले.मात्र पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी मध्यरात्री अमळनेर गाठले.धुळ्यात पोहोचलेल्या महाले आणि शिंदे यांच्यासह सर्वच संशयिताना कराळे यांनी पुन्हा चौकशीसाठी बोलावले. तासाभराच्या चौकशीनंतर अधीक्षक कराळे यांच्या सूचनेवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर महाले आणि शिंदे यांना  रात्री अडिच वाजता अटक करण्यात आली. धुडकू मोरे आणि विनोद महाले यांचाही  आरोपींमध्ये समावेश आहे. खडणी आणि अपहाराचा चौंघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे:

Web Title: Dhule, Shiv Sena city president Arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.