भुसावळ येथे ‘रासेयो’तर्फे डेंग्यू जनजागृती रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 12:38 AM2018-09-26T00:38:53+5:302018-09-26T00:39:56+5:30

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

Dengue Public awareness rally organized by Rseyo at Bhusawal | भुसावळ येथे ‘रासेयो’तर्फे डेंग्यू जनजागृती रॅली

भुसावळ येथे ‘रासेयो’तर्फे डेंग्यू जनजागृती रॅली

Next
ठळक मुद्दे डेंग्यूचे रुग्ण आढळल्यानंतर केली जनजागृतीरॅलीत विविध घटकांचा सहभाग

भुसावळ, जि.जळगाव : येथील नाहाटा कनिष्ठ महाविद्यालयातील रासेयो अधिक दोन स्तरच्या स्वयंसेवकांनी राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त मंगळवारी डेंग्यू जनजागृतीपर रॅली काढली.
नाहाटा महाविद्यालयापासून सकाळी १० वाजता रॅलीची सुरुवात झाली. दीनदयाल नगर, सिंधी कॉलोनी, आनंद नगर, बम्ब कॉलोनी, राणातील महादेव मंदीर अशा विविध भागातून रॅली नेण्यात आली. सर्व स्वयंसेवकांनी ‘मच्छरदानी का प्रयोग करे, डेंग्यू की बीमारी से दूर रहे, यदी साफसफाई और स्वच्छता में है विश्वास, तो डेंग्यू की बीमारी नहीं रहेगी आसपास’ या सारख्या अनेक घोषणा दिल्या. डेंग्यूचा ताप कशामुळे होतो, डेंग्यूची लक्षणे, उपचार, बचाव व एडिस इजिप्त मच्छराची वैशिष्ट्ये अशा विविध पैलूंचे पोस्टर प्रदर्शन व मार्गदर्शन रॅलीतून करण्यात आले.
भुसावळमध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळून आले. याच कारणाने नाहाटा कनिष्ठ महाविद्यालयातील रासेयो दोन अधिक स्तरच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांनी या डेंग्यू जनजागृती रॅलीचे आयोजन केले.
रॅलीचे आयोजन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. शारदा सोनवणे, प्रा.ललिता धांडे, प्रा.मनोज वारके, प्रा.महेश गोसावी, प्रा.माधुरी चौधरी, प्रा.तुषार चौधरी यांनी केले. रॅलीस ताप्ती एज्युकेशन सोसाईटीचे अध्यक्ष मोहन फालक, प्राचार्या डॉ.एम.व्ही.वायकोळे, उपप्राचार्य प्रा.शैलेश पाटील व पर्यवेक्षक प्रा.यु.बी.नंदाणे यांनी शुभेच्छा दिल्या.



 

Web Title: Dengue Public awareness rally organized by Rseyo at Bhusawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.