रावेर येथे श्री दत्त-कृष्ण रथोत्सवाच्या पालखीला आकाशातील आतीषबाजीचा रंगबहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 01:06 AM2018-12-25T01:06:05+5:302018-12-25T01:07:03+5:30

श्री सद्गुरु सच्चिदानंद स्वामी महाराज यांनी दत्तजयंतीनिमित्त रूढ केलेल्या श्री दत्त-कृष्ण रथोत्सवाची १८१ वी नगरपरिक्रमा रविवारी पूर्ण करण्यात आली.

Datta-Krishna Rathod | रावेर येथे श्री दत्त-कृष्ण रथोत्सवाच्या पालखीला आकाशातील आतीषबाजीचा रंगबहार

रावेर येथे श्री दत्त-कृष्ण रथोत्सवाच्या पालखीला आकाशातील आतीषबाजीचा रंगबहार

googlenewsNext
ठळक मुद्देआतीषबाजीचा नयनरम्य सोहळा ‘याची देही याची डोळा’ साठवण्यासाठी आठवडे बाजार परिसराला प्रेक्षकांचे भरतेश्री दत्त-कृष्ण रथोत्सवाची १८१ वी नगरपरिक्रमा पूर्ण

रावेर, जि.जळगाव : श्री सद्गुरु सच्चिदानंद स्वामी महाराज यांनी दत्तजयंतीनिमित्त रूढ केलेल्या श्री दत्त-कृष्ण रथोत्सवाची १८१ वी नगरपरिक्रमा रविवारी पूर्ण करण्यात आली.
श्री दत्त मंदिरात हभप भाऊराव महाराज यांच्या दुपारी झालेल्या काल्याच्या कीर्तनानंतर भजनी मंडळांच्या टाळमृदंगाच्या गजरात काढण्यात आलेल्या श्री विठ्ठल- रखुमाईंची सगुणमूर्ती व श्री दत्तप्रभुंच्या निर्गुण पादुकांची तथा सद्गुरू श्री सच्चिदानंद स्वामी महाराजांच्या मेण्याच्या पालखी उत्सवाची आठवडे बाजार परिसरात रात्री उशिरा आकाशात करण्यात आलेल्या फटाक्यांच्या आतिषबाजीचा रंगबहारदार विद्युल्लतापाने मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली.
हा परंपरागत दारूगोळा म्हणून प्रचलित असलेल्या रंगबहारदार व चित्तरंजक फटाक्यांच्या आतीषबाजीचा डोळ्यांची पारणे फेडणारा सोहळा याची देही याची डोळा.. ह्रदयात साठवण्यासाठी शहर तथा परिसरातील आबालवृद्ध महिला पुरूष भाविकांनी आठवडे बाजार परिसर फुलून गेला होता.
शहराचा ग्रामोत्सव ठरलेल्या श्री दत्तजयंती निमित्त काढण्यात येणाऱ्या श्री दत्त-कृष्ण रथोत्सवाने मोठ्या उत्साहात १८१ नगरप्रदक्षिणा पूर्ण केली. या रथोत्सवाची सांगता पालखी सोहळ्याने करण्याची परंपरा आहे. त्या अनुषंगाने दुपारी श्री दत्त मंदिरात हभप भाऊराव महाराज यांचे काल्याचे संकीर्तन झाले.
दरम्यान, श्रीरंग कुलकर्णी व श्रुती कुलकर्णी यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल रखुमाईंच्या मूतीर्ला व श्री दत्त प्रभूंच्या निर्गुण पादुकांची महाभिषेक व महापूजा करून भजनी मंडळांच्या निनादात पालखीत स्थानापन्न करण्यात आले. सद्गुरू श्री सच्चिदानंद स्वामी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुशोभित केलेल्या मेण्यात स्थानापन्न करण्यात आले. भजनी मंडळांच्या टाळमृदंगाच्या गजरात हरिभजने आळवीत पालखी सोहळ्याला श्री दत्त मंदिरातून आरंभ करण्यात आला.
शहरातील सुवर्णकार समाजाची पालखी सोहळ्यात पालखी व मेणा खांद्यावर वाहून नेण्याची सेवा देण्याचा असलेला वारसा पाहता विजय गोटीवाले, हेमंत सोनगीरकर, दिलीप तारकस, चंद्रकांत बाळापुरे, गजानन तारकस,अशोक सोनार,संजय बाळापुरे, अशोक भिडे, अशोक तारकस, बजरंग गोटीवाले, राजाराम सोनार व विनायक पिंजारकर यांनी पालखी सोहळ्यात आपली सेवा समर्पित केली.
भजनी मंडळांच्या निनादात पालखी व मेणा व त्यापाठोपाठ आठवडे बाजार परिसरात दहिहंडी फोडण्यासाठी श्रीकृष्णाच्या वेशभूषेतील तीर्थ जोशी, वेद जोशी - रसलपूर(बलराम), कार्तिक वैद्य (रावेर) यांची सुशोभित बैैलजोडीवरील दमनीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. गोपाळकृष्ण व बलराम यांच्या वेशभूषेची सेवा सुधाकर वैद्य यांनी तर दहीहंडीच्या नियोजनाची सेवा किशोर वाणी यांनी समर्पित केली.
शहरातील रथाच्या मार्गावरून गांधी चौकमार्गे आठवडे बाजार चौकात मार्गस्थ झालेल्या पालखी व मेण्याचे ठिकठिकाणी सुवासिनींनी औक्षण घालून श्री विठ्ठल रखुमाईंचे, श्री दत्तप्रभुंच्या पादुकांचे व सद्गुरू श्री सच्चिदानंद स्वामी महाराज यांच्या दर्शनाचा लाभ घेतला.
आठवडे बाजार परिसरात पालखी सोहळा विसावल्यानंतर संतांच्या व श्री विठोबा रखुमाईंचे आरती सोहळ्यात श्रीकृष्ण व बलरामाच्या वेशभूषेतील बालकांनी दहीहंडी फोडण्याचा बहूमान पटकावला. दरम्यान पसायदानाने पालखी सोहळयाची सांगता केली. दरम्यान, लोहार परिवाराच्या दारूगोळा सोहळ्याची सेवा पोलीस पाटील लक्ष्मीकांत लोहार, सतीश नाईक, सुधाकर नाईक मित्र परिवाराने अव्याहतपणे कायम राखत आठवडे बाजार चौकात खच्चून भरलेल्या आबालवृद्ध महिला पुरूष भाविकांच्या डोळ्याची पारणे फेडण्यासाठी चित्तरंजक व रंगबहारदार आकाशातील फटाक्यांची आतषबाजी करून रथोत्सव पालखी सोहळयाची खºया अर्थाने सांगता केली. नगराध्यक्ष दारा मोहंम्मद, उपनगराध्यक्ष संगीता वाणी, भुसावळचे सामाजिक कार्यकर्ते धीरज चौधरी, माजी नगराध्यक्ष हरीश गणवानी, भाजप जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, नगरसेवक आसिफ मोहंमद, अ‍ॅड.सुरज चौधरी, सुधीर पाटील, सादीक शेख, राजेंद्र महाजन आदी मान्यवरांच्याहस्ते अवकाशातील चित्ताकर्षक फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

Web Title: Datta-Krishna Rathod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.