अर्थसंकल्पाबाबत जळगावात संमिश्र प्रतिक्रिया, कृषी क्षेत्राच्या तरतुदीमुळे उद्योगांना फायदा होण्याची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 10:51 PM2018-03-09T22:51:44+5:302018-03-09T22:51:44+5:30

व्यापार, उद्योगांच्या पदरी निराशा

Composite response of budget | अर्थसंकल्पाबाबत जळगावात संमिश्र प्रतिक्रिया, कृषी क्षेत्राच्या तरतुदीमुळे उद्योगांना फायदा होण्याची अपेक्षा

अर्थसंकल्पाबाबत जळगावात संमिश्र प्रतिक्रिया, कृषी क्षेत्राच्या तरतुदीमुळे उद्योगांना फायदा होण्याची अपेक्षा

Next
ठळक मुद्देउद्योगांसाठी मोठी घोषणा नाहीचस्थानिक कर ‘जैसे थे’

आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. ९ - केंद्राप्रमाणे राज्याच्याही अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात आली असल्याने त्याचा फायदा सर्वच क्षेत्रांना होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र कोट्यवधींचा कर भरणाºया व्यापारी, उद्योजकांसाठी भरीव उपाययोजना नसल्याने या क्षेत्रात नाराजीचा सूर असला तरी कृषी क्षेत्रामुळे फायदा होणार असल्याचा सूर आहे, यामुळे एकूणच अर्थसंकल्पाबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे.
शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प जाहीर झाला. या बाबत व्यापारनगरी तसेच डाळ व पाईप उद्योगांचे माहेर घर असलेल्या जळगावातील उद्योजक, व्यापाºयांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता निवडणुका डोळ््यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर केल्याचाही सूर उमटला.
कोट्यवधींचा कर भरणाºयांची निराशा
राज्यातील व्यापाºयांकडून दरवर्षी सरकार १ लाख ६५ हजार कोटी रुपयांचा कर वसूल करते. मात्र त्यांचा या अर्थसंकल्पात विचार झाला नसल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे. कृषी क्षेत्रासाठी तरतूद केली असली तरी सध्या शेतकºयांची बिकट स्थिती व सरकारबद्दलची त्यांची नाराजी ओळखून सरकारने २०१९च्या निवडणुकांचा विचार करीत कृषी क्षेत्रासाठी ही तरतूद केली असल्याचेही व्यापाºयांचे म्हणणे आहे.
राज्य सरकारी कर्मचाºयांना सातवा वेतन आयोगाबाबत सरकारने घोषणा केली, मात्र त्याची अंमलबजावणी कधी व कशी करणार याबाबत ठोस सांगितलेले नाही. कर्मचाºयांना आयोग मिळाल्यास त्याचा थेट फायदा बाजारपेठेत होतो, त्यामुळे हा आयोग लवकर लागू होण्याची अपेक्षा व्यापारी वर्गातूनही होत आहे.
स्थानिक कर ‘जैसे थे’
मूल्यवर्धीत कर (व्हॅट) व इतर कर जीएसटीमुळे नसले तरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर, व्यवसाय कर अद्यापही भरावे लागत आहे. ते रद्द होण्याची अपेक्षा होती, मात्र तसे न झाल्याने नाराजी आहे.
उद्योगांसाठी मोठी घोषणा नाहीच
पायाभूत सुविधांमध्ये रस्ते उभारणीची घोषणा असली तरी उद्योगांसाठी मोठी घोषणा नसल्याने अपेक्षाभंग झाल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.
शीतगृहांमुळे फायदा
शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करणे तसेच शीतगृह उभारणी यामुळे कृषी माल व एकूणच शेतकºयांना फायदा होणार आहे. यामुळे माल जास्त दिवस टिकून राहील, वर्षभर बाजारपेठेत चांगला माल येईल व भाव स्थिर राहण्यास मदत होईल, यामुळे बाजारपेठ, उद्योगांनाही फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शेतकºयांची स्थिती सुधारल्यास कृषी पूरक डाळ, पाईप उद्योगांनाही फायदा होईल, असा सूर उद्योजकांकडून उमटला.
कौशल्य विकास मार्गदर्शनामुळे फायदा
विदेशात शिक्षणासाठी जाणाºया विद्यार्थ्यांना आता सरकारच कौशल्य विकासाबाबत मार्गदर्शन करण्याची घोषणा करण्यात आल्याने त्याचा फायदा विद्यार्थ्यांना व उद्योगांना होईल, असे उद्योजकांचे म्हणणे आहे.

कृषी क्षेत्रातील तरतुदींमुळे सर्वच क्षेत्रांना फायदा होण्यासाठी कौशल्य विकास मार्गदर्शनामुळे उद्योगांनाही फायदा होईल. मात्र उद्योगांसाठी अपेक्षित असलेली मोठी घोषणा नाही.
- प्रेम कोगटा, अध्यक्ष, जळगाव दालमिल ओनर्स असोसिएशन.

कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद केल्याने कृषी पूरक उद्योगांना फायदा होणार आहे. या सोबतच पायाभूत सुुविधांवर सरकारचा भर असल्याने त्यास नवीन उद्योग येण्यास चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
- अंजनीकुमार मुंदडा, प्रदेश सचिव, लघु उद्योग भारती.

शीतगृहांमुळे शेतीमाल तसेच बाजारपेठेसही फायदा होईल. मात्र स्थानिक कर कमी रद्द होण्याची अपेक्षा होती, ते झाले नाही.
- प्रवीण पगारिया, अध्यक्ष, गे्रन किराणा मर्चंट असोसिएशन

निवडणुका डोळ््यासमोर ठेवून कृषीसाठी उपाययोजना करण्याचे सरकारचे धोरण दिसून येत आहे. कोट्यवधी कर भरणाºया व्यापाºयांनाच्या पदरी अर्थसंकल्पातून निराशा पडली आहे.
- पुरुषोत्तम टावरी, उपाध्यक्ष, राज्य व्यापारी महासंघ.

Web Title: Composite response of budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.