जळगाव शहरात दहावीच्या विद्यार्थ्याने गळफास घेवून संपविली जीवनयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 04:55 PM2018-02-10T16:55:02+5:302018-02-10T16:57:15+5:30

शहरातील दादावाडी परिसरातील गजानन पार्क येथील कृष्णा संदिप शिंदे या आठवीच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच दुसºया दिवशी यश नितीन इंगळे (वय १५) या दहावीच्या विद्यार्थ्यानेही राहत्या घरात बेडशीटने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री पावणे अकरा वाजता आदर्श नगरात घडली. यशच्या आत्महत्येचे कारण समजलेले नाही.

A Class X student dies in Jalgaon City | जळगाव शहरात दहावीच्या विद्यार्थ्याने गळफास घेवून संपविली जीवनयात्रा

जळगाव शहरात दहावीच्या विद्यार्थ्याने गळफास घेवून संपविली जीवनयात्रा

Next
ठळक मुद्देआदर्श नगरातील घटनासलग दुस-या घटनेमुळे शहरात खळबळ परिक्षेमुळे तणावात असल्याची शक्यता

आॅनलाईन लोकमत
जळगाव दि, १० : शहरातील दादावाडी परिसरातील गजानन पार्क येथील कृष्णा संदिप शिंदे या आठवीच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच दुसºया दिवशी यश नितीन इंगळे (वय १५) या दहावीच्या विद्यार्थ्यानेही राहत्या घरात बेडशीटने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री पावणे अकरा वाजता आदर्श नगरात घडली. यशच्या आत्महत्येचे कारण समजलेले नाही.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शुक्रवारी रात्री जेवण झाल्यानंतर यश हा अभ्यासासाठी वरच्या मजल्यावर गेला. तेथेच तो झोपतो. लाईट सुरुच असल्याने आई हेमलता या पावणे अकरा वाजता लाईट बंद करण्यासाठी वरच्या मजल्यावर गेल्या असता यश याने बेडशीटने गळफास घेतल्याचे दिसून आले. मुलाची ही अवस्था पाहतातच त्यांनी जोरदार हंबरडा फोडला. हा आवाजा ऐकून पती नितीन इंगळे हे धावून आले. दरम्यान,यशला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले असता तेथे डॉक्टरांनी मृत घोषीत केले. दरम्यान, दहावीच्या परिक्षेमुळे त्याने आत्महत्या केली असावी अशी शक्यता कुटुंबाने वर्तविली आहे.
दरम्यान, रामानंद नगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक बी.जी.रोहोम व सहकाºयांनी घटनास्थळाची पाहणी केली. पंचनामा करण्यात आला.वैद्यकिय अधिकारी डॉ.अजय सोनवणे यांच्या माहितीवरुन रात्री रामानंद नगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास विनोद शिंदे करीत आहेत.

Web Title: A Class X student dies in Jalgaon City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.