‘राष्टÑवादी’तील गटबाजी दूर करण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 11:31 PM2018-09-15T23:31:25+5:302018-09-15T23:32:26+5:30

शरद पवार रविवारी जळगाव जिल्ह्यात

The challenge to remove the grouping of 'Nation- | ‘राष्टÑवादी’तील गटबाजी दूर करण्याचे आव्हान

‘राष्टÑवादी’तील गटबाजी दूर करण्याचे आव्हान

googlenewsNext
ठळक मुद्देपक्षाची स्थिती बिकटमनपाच्या निवडणुकीत राष्टÑवादीला भोपळाही फोडता आला नाही

विकास पाटील
जळगाव : जिल्ह्यातील राष्टÑवादी काँग्रेसमधील गटबाजी दूर करुन आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देण्यासाठी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कामाला लावण्याचे मोठे आव्हान राष्टÑवादीपुढे आहे.
पक्षाचे राष्टÑीय अध्यक्ष शरद पवार हे आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. ते काय ‘मात्रा’ देतात याकडे लक्ष लागून आहे.
जिल्ह्यातील राष्टÑवादी काँग्रेसची स्थिती दयनिय आहे. नुकत्याच झालेल्या मनपाच्या निवडणुकीत राष्टÑवादीला भोपळाही फोडता आला नाही. २०१३ मध्ये झालेल्या मनपा निवडणुकीत राष्टÑवादी काँग्रेसचे ११ नगरसेवक निवडून आले होते. यावेळी मात्र पक्षाला खाते उघडता आले नाही. भाजपाने मनपा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाचे विद्यमान नगरसेवक आपल्याकडे खेचून त्यांना उमेदवारी दिली. हे नगरसेवक आपल्याकडे यावेत यासाठी दोन महिन्यांपासून भाजपाकडून प्रयत्न सुरु असताना पक्षाचे नेते हातावर हात ठेवून होते, त्यामुळे पक्षाचे मोठे नुकसान झाले.
एवढेच नव्हे तर जळगावचे महानगराध्यक्षही मनपा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. अशा स्थितीत जिल्ह्यातील पक्षाच्या नेत्यांनी मनपा निवडणुकीत यश मिळविण्यासाठी मेहनत घेणे आवश्यक होते. मात्र जिल्ह्यातील नेतेच काय तर राज्यातील दोन-तीन नेते सोडले तर कुणीही जळगावात फिरकले नाही. जिल्ह्याचे प्रभारी असलेले दिलीप वळसे पाटील यांनी एकही जाहीर सभा घेतली नाही. पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक व जितेंद्र आव्हाड या दोन नेत्यांच्या सभा झाल्या. इतर स्टार प्रचारक फिरकलेच नाही. माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर तसेच गफ्फार मलिक यांनी खिंड लढविली.
जिल्ह्यातील इतरही नेते पक्षाच्या बैठकांना उपस्थित राहिले मात्र उमेदवारांच्या प्रचारासाठी फिरताना दिसले नाही. मेहनत घेतली असती तर मनपात कदाचित चित्र वेगळे दिसले असते.
पक्षात गटबाजी आहे. राज्यस्तरावरील नेत्यांच्या उपस्थितीत होणाºया बैठकांनाच फक्त नेते पक्षाच्या कार्यालयात एका व्यासपीठावर येतात. बैठका झाल्यानंतर पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी अथवा निवडणुकांमध्ये पक्षाला यश मिळवून देण्यासाठी एकत्र येताना दिसत नाही.
लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत. अशा स्थितीत ही गटबाजी पक्षाला परवडणारी नाही.
भाजपा व शिवसेना हे पक्ष आगामी निवडणुकांच्या तयारीला लागले असताना पक्षाचा अजून उमेदवारही निश्चित नाही. दोन्ही लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवायची की नाही? याबाबतही स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते संभ्रमात आहेत.
विरोधी पक्ष असताना विरोधकाची भूमिका चोखपणे बजावताना पक्ष जिल्ह्यात दिसत नाही. सत्तेत असताना शिवसेना कर्जमाफीच्या मुद्यावर आंदोलन करताना दिसते तर राष्टÑवादी केवळ बघ्याची भूमिका घेते. पक्षाने आक्रमक भूमिका घेत नागरिकांना न्याय मिळवून दिला पाहिजे, अशी अपेक्षा नागरिकांची आहे.

Web Title: The challenge to remove the grouping of 'Nation-

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.