९ ऐवजी ११ कामे बनावट कागदपत्रांच्या आधारे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 10:48 PM2018-11-22T22:48:09+5:302018-11-22T22:48:36+5:30

खडसेंचे पोलीस अधीक्षकांना पत्र

 Allotment of 11 works based on fake documents | ९ ऐवजी ११ कामे बनावट कागदपत्रांच्या आधारे वाटप

९ ऐवजी ११ कामे बनावट कागदपत्रांच्या आधारे वाटप

Next
ठळक मुद्दे अनुप्रेम कन्स्ट्रक्शन्स व उज्ज्वलकुमार बोरसे यांच्यावर गुन्हे दाखलची मागणी

जळगाव: सार्वजनिक बांधकाम उत्तर विभाग कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मक्तेदाराशी संगनमत करून बनावट ई-मेलद्वारे खोटे दस्तावेज खरे भासविल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. मात्र चौकशी अधिकारी भिकन दाभाडे यांच्या अहवालानुसार विजय सोनू बढे, भुसावळ व उज्ज्वलकुमार बोरसे यांनी सेहगल स्टील इंडस्ट्रीजचे एकसारखेच बिल वापरले असल्याचे स्पष्ट केलेले असतानाही त्यांना फिर्यादीतून वगळण्यात आले आहे. त्यांच्यावर तसेच अनुप्रेम कन्स्ट्रक्शन्सवर गुन्हे दाखल करण्याची मागणी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी पोलीस अधीक्षकांकडे पत्राद्वारे केली आहे. तसेच ११ कामांचे वाटप बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा आरोप केला आहे.
११ कामांचे बनावट कागदपत्रांच्या आधारे वाटप
खडसे यांनी पत्रात म्हटले आहे की,सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, नाशिक (दक्षता व गुणनियंत्रक मंडळ) यांच्या १७ मे २०१८ च्या चौकशी अहवालात नोटीस क्र. ४ व ५ मधील ७३ पैकी ९ कामे बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रदान केल्याचे नमूद केलेले आहे. मात्र या निविदा नोटीसीतील निविदा क्र.५२४९१ (पान क्र.३९ व ४०) व क्र.५२३१२ (पान क्र.२३ व २४ ) मध्ये सुद्धा विनय सोनू बढे यांनी दाखल केलेल्या सेहगल स्टील इंडस्ट्रीजच्या बनावट बिलांसारखे जसेच्या तसे बिल मक्तेदार उज्ज्वलकुमार बोरसे यांनी दाखल केलेले असतानाही हेतुपुरस्कर दक्षता व गुणनियंत्रण मंडय यांनी या कामांची चौकशी टाळलेली आहे. यात उज्ज्वल बोरसे यांचे नावसुद्धा दोषी म्हणून यायला हवे होते. ९ ऐवजी ११ कामे बनावट कागदपत्रांच्या आधारे दिली गेली आहेत, असे अहवालात नमूद पाहिजे होते. तसेच जिल्हापेठ पोलीस निरीक्षकांनी सुद्धा कार्यकारी अभियंता परदेशी यांना २३ आॅक्टोबर २०१८ रोजीच्या पत्राद्वारे तपासाठी मक्तेदार उज्जल बोरसे यांनी कोणकोणत्या निविदेसोबत सेहगल स्टील इंडस्ट्रीजची बिले जोडलेली आहेत. त्या निविदेची कागदपत्र मागितलेली आहेत. असे असतानाही बोरसे यांच्यावर गुन्हा दाखल केलेला नाही. बोरसे व अनुप्रेम कन्स्ट्रक्शन्सवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

Web Title:  Allotment of 11 works based on fake documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.