जळगावातील १५ प्लास्टीक विक्रेत्यांसह २ उत्पादकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 02:48 PM2018-05-18T14:48:50+5:302018-05-18T14:48:50+5:30

मनपा आरोग्य विभागाकडून शहरातील प्लास्टीक विक्रेता व उत्पादकांवर कारवाईची मोहीम सुरुच असून, गुरुवारी १५ किरकोळ विक्रेत्यांसह एमआयडीसीमधील २ उत्पादकांवर दंडाची कारवाई करण्यात आली आहे.

Action on 2 growers including 15 plastic sellers in Jalgaon | जळगावातील १५ प्लास्टीक विक्रेत्यांसह २ उत्पादकांवर कारवाई

जळगावातील १५ प्लास्टीक विक्रेत्यांसह २ उत्पादकांवर कारवाई

Next
ठळक मुद्देमनपाच्या आरोग्य विभागाची कारवाईशंभरहून अधिक विक्रेत्यांवर तर ६ उत्पादकांवर कारवाईमनपाकडून कारवाई सुरुच ठेवण्याचा इशारा

आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.१८ : मनपा आरोग्य विभागाकडून शहरातील प्लास्टीक विक्रेता व उत्पादकांवर कारवाईची मोहीम सुरुच असून, गुरुवारी १५ किरकोळ विक्रेत्यांसह एमआयडीसीमधील २ उत्पादकांवर दंडाची कारवाई करण्यात आली आहे.
तीन दिवसांपासून मनपा आरोग्य विभागाकडून राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे ५० मायक्रॉनपेक्षा कमी प्लास्टीकच्या पिशव्या किंवा इतर वस्तू विक्री करणाऱ्या विक्रेते व उत्पादकांवर कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत शंभरहून अधिक विक्रेत्यांवर तर ६ उत्पादकांवर कारवाई करण्यात आली आहे. गुरुवारी शहरातील अयोध्या नगर, सुभाष चौक, पोलनपेठ, तांबापुरा भागात कारवाई करण्यात आली. तसेच मनपा आरोग्य अधिकाºयांनी शहरातील सर्व सुवर्ण व्यवसायीक, मॉल, शॉपीच्या संचालकांना देखील प्लास्टीक पिशव्यांचा वापर व विक्रीला बंदी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली असून, कोणत्याही ठिकाणी प्लास्टीक विक्री करताना आढळल्यास कारवाई करण्याचा इशारा मनपा आरोग्य विभागाकडून देण्यात आला आहे.
या विक्रेत्यांवर करण्यात आली कारवाई
एमआयडीसी मधील दिनेश एंटरप्रायजेस व अमरेला अ‍ॅण्ड पॉलिमर्स या दोन उत्पादकांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांना प्रत्येकी १५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यांच्यासह न्यू बुरहानी प्रोव्हीजन, नयनगिरी गोस्वामी, राज प्रोव्हीजन, कैलास भोई, संजय सोमाणी, सतीश जनरल स्टोअर्स, गफ्फार शेख रज्जाक, राजेश मंधान, भिकन खान अकिर खान, कमलेश मोरे, अनिल मंधान व महेंद्र जैन यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

Web Title: Action on 2 growers including 15 plastic sellers in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.