भाऊबिजेसाठी जात असलेल्या भावाचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 06:39 PM2017-10-20T18:39:22+5:302017-10-20T18:43:48+5:30

जामनेर, दि.20 : धामणगांव बढे येथून शेवगे पिंप्री येथे बहिणीला भेटायला मोटार सायकलने जात असलेल्या भावास फत्तेपूर गावाजवळ शुक्रवारी सकाळी 11 वाजता अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

Accidental death of brother going to brother-in-law | भाऊबिजेसाठी जात असलेल्या भावाचा अपघाती मृत्यू

भाऊबिजेसाठी जात असलेल्या भावाचा अपघाती मृत्यू

Next
कमत अॉनलाईन जामनेर, दि.20 : धामणगांव बढे येथून शेवगे पिंप्री येथे बहिणीला भेटायला मोटार सायकलने जात असलेल्या भावास फत्तेपूर गावाजवळ शुक्रवारी सकाळी 11 वाजता अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली. बबलु देवीदास माळी (वय२७) असे या मृत तरुणाचे नाव आहे. तो शेवगे पिंप्री येथील रहिवासी आहे. धामणगांवबढे ते सुरत या मार्गावरील विपुल ट्रँव्हल्सवर तो क्लिनर म्हणुन काम करीत असे. आज सकाळी गाडी धामणगांवबढे येथे आल्यावर तो मोटार सायकल घेवुन गावाकडे बहिणीला भेटायला निघाला असता हा अपघात घडला. अपघातानंतर घटनास्थळावरून मृतदेह दवाखान्यात आणण्यात आला. या ठिकाणी डॉक्टरांनी बबलू माळी याला मृत घोषित केले. पाडव्याच्या दिवशी झालेल्या या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी जामनेर पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Accidental death of brother going to brother-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.