मालमत्ता खरेदीत शासनाची फसवणूक; फैजपूरच्या माजी नगराध्यक्षांसह सात जणांवर गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 07:56 PM2022-11-18T19:56:42+5:302022-11-18T19:57:29+5:30

मालमत्ता खरेदीत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी फैजपूरच्या माजी नगराध्यक्षांसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

A case has been registered against seven persons including the former mayor of Faizpur for defrauding the government in the purchase of property  | मालमत्ता खरेदीत शासनाची फसवणूक; फैजपूरच्या माजी नगराध्यक्षांसह सात जणांवर गुन्हा 

मालमत्ता खरेदीत शासनाची फसवणूक; फैजपूरच्या माजी नगराध्यक्षांसह सात जणांवर गुन्हा 

googlenewsNext

राजेंद्र भारंबे 

सावदा (जळगाव) : मालमत्ता खरेदीत शासनाची ६५ हजारांत फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी फैजपूरच्या माजी नगराध्यक्षा अमिता हेमराज चौधरी यांच्यासह सात जणांवर सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमिता चौधरी यांच्यासह फैजपूर येथील विशेष वसुली अधिकारी भागवत लक्ष्मण पाटील, सुमाई पतसंस्थेचे चेअरमन अनिल विनायक पाटील,  जितेंद्र प्रकाश पवार (मयत), कविता जितेंद्र पवार, युगंधर जितेंद्र पवार (रा. सावदा) आणि  नितीन चंद्रकांत पाटील (फैजपूर) अशी या गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. 

फैजपूर येथील युवराज सुदाम तळेले हे फैजपूर विविध कार्यकारी सोसायटीचे थकबाकीदार आहेत.  त्यांच्या मालकीच्या दोन मालमत्ता सोसायटीने जप्त केल्या होत्या. भागवत पाटील यांनी या मालमत्ता बखळ असल्याचे भासवून सुमाई ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे चेअरमन अनिल विनायक पाटील यांना लिलाव केल्या.  बांधकाम असताना या दोन मालमत्ता बखळ असल्याचे दाखविण्यात आले. या दरम्यान,  जितेंद्र पवार यांचे निधन झाले. ही जागा त्यांचे वारस कविता व युगंधर पवार (रा. सावदा) यांच्या नावे झाली. हीच मालमत्ता पुढे अमिता चौधरी व नितीन पाटील यांनी जानेवारी २०२२ मध्ये खरेदी केली आणि यात शासनाचा जवळपास ६८ हजाराचा महसूल बुडाला. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच दुय्यम निबंधक प्रशांत कुलकर्णी यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार अन्वर तडवी हे करीत आहेत.

 

 

Web Title: A case has been registered against seven persons including the former mayor of Faizpur for defrauding the government in the purchase of property 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.