23 लाखांचे जंतू व दुरगधीनाशक धुळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 12:28 PM2017-07-29T12:28:39+5:302017-07-29T12:33:25+5:30

धक्कादायक : 5 महिन्यात फक्त 300 लीटर रसायनाचा वापर; बालगंधर्व नाटय़गृहात साहित्य पडून

23-laakhaancae-jantauu-va-dauragadhainaasaka-dhaulakhaata | 23 लाखांचे जंतू व दुरगधीनाशक धुळखात

23 लाखांचे जंतू व दुरगधीनाशक धुळखात

Next
ठळक मुद्देतब्बल 1700 लीटर रसायन धूळखात पडूनगोदामामध्ये प्रचंड अस्वच्छताकचरा उचलण्यासाठीच्या 100 ढकलगाडय़ापैकी  11 पडून

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 29 - मनपातर्फे 23 लाख 70 हजार रुपये खर्च करून फेब्रुवारी महिन्यात खरेदी केलेले जंतू नाशके व दुरगधी नाशके पडून असून पाच महिन्यात केवळ 300 लीटर हे रसायन वापरले गेले आहे. तब्बल 1700 लीटर रसायन धूळखात पडून असल्याची धक्कादायक माहिती मनपा स्थायी समितीच्या सभापती वर्षा खडके व नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी या ठिकाणी दिलेल्या भेटीत समोर आली आहे. एवढेच नव्हे तर अनेक कचरकुंडय़ा, ढकलगाडय़ा व स्वच्छतेसाठी लागणारे झाडूही येथे पडून असल्याचे आढळून आले. 
महापालिकेच्या आरोग्य विभागाचे गोदाम बालगंधर्व खुले नाटय़गृहाच्या मागील बाजूस असलेल्या स्वच्छतागृहात आहे. या ठिकाणी मनपा स्थायी समितीच्या सभापती खडके व भाजपाचे नगरसेवक सोनवणे यांनी आज भेट दिली. नाटय़गृहातील स्वच्छतागृहाचा वापर बंद करून तेथे मनपाच्या आरोग्य विभागाचे गोदाम करण्यात आले असल्याची माहितीही समोर आली आहे. 
केमिकलचा वापरच नाही
सध्या सर्वत्र पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून रासायनिक द्रव्ये फवारले जावे अशी मागणी होत असते. गेल्या स्थायी समिती सभेत या विषयावर चर्चा झाली होती. मात्र पाच महिन्यात या केमिकलचा फारसा वापर झालेलाच नाही. थोडे वापरून उर्वरित धूळखात पडून असल्याचेही या ठिकाणी लक्षात आले. 
या ठिकाणी मिळालेल्या नोंदीनुसार केवळ 300लीटर जंतू नाशके पाच महिन्यात वापरण्यात आली आहेत. उर्वरित जंतू नाशके या ठिकाणी पडून आहेत. शिल्लक जंतू नाशकांच्या नोंदीही चुकीच्या दाखविण्यात आल्या आहेत. वापर कमी मात्र नोंद जास्त वापराची दाखविल्याचा प्रकारही या ठिकाणी उघडकीस आला आहे. 


लाखोंचे साहित्य पडून
शहरातील सार्वजनिक शौचालयांच्या ठिकाणी व गटारींमध्ये जंतू नाशके व दरुगधी नाशकही टाकले जात असते. फेब्रुवारी महिन्यात मनपा आरोग्य विभागाने विविध सार्वजनिक शौचालयांच्या ठिकाणी डेमो घेऊन काही जंतू नाशके व दरुगधी नाशके खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता.
गोदामामध्ये प्रचंड अस्वच्छता आढळून आली असून गुटखाच्या रिकाम्या पुडय़ाही पडून असल्याचे दिसून आले. 
दोन प्रकारच्या केमिकलची ही खरेदी असताना या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या रजिस्टरमध्ये एकत्र नोंद घेण्यात आली आहे. 1800 लीटर केमिकल खरेदीची ही एकत्रित नोंद आहे. तसेच रजिस्टरमध्ये आवक, जावक अशा प्रकारच्या कोणत्याही नोंदी नसल्याचेही लक्षात आले. 
शहरातील विविध व्यापारी संकुलांमध्ये ठेवण्यासाठी 80 नग लहान प्लास्टिकच्या कचरा कुंडय़ा महापालिकेने खरेदी केल्या होत्या. यातील 27 कचरा कुंडय़ा या ठिकाणी पडून आहेत.  तसेच कचरा उचलण्यासाठीच्या 100 ढकलगाडय़ापैकी  11 पडून आहेत. 2007 मध्ये खरेदी केलेले झाडूही अद्याप      पडून होते.

Web Title: 23-laakhaancae-jantauu-va-dauragadhainaasaka-dhaulakhaata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.