जिद्द असणाऱ्या युवकांनी नवनिर्माण घडवावे : राज ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 12:56 AM2018-07-23T00:56:00+5:302018-07-23T00:56:25+5:30

महाराष्ट्र, मराठवाड्याच्या विकासासाठी काही तरी नवीन करून दाखविण्याची जिद्द असणा-या युवकांनी विकासाचे मुद्दे घेऊन आपल्या सोबत आल्यास त्यांना आपण पदाच्या माध्यमातून संधी देऊ, निवडणुका या गमतीचा विषय नसून, यावेळी जागृत राहून योग्य त्यांना मतदान केल्यासच महाराष्ट्राचा विकास होऊ शकेल असे प्रतिपादन नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांनी केले.

Youth should create reform: Raj Thackeray | जिद्द असणाऱ्या युवकांनी नवनिर्माण घडवावे : राज ठाकरे

जिद्द असणाऱ्या युवकांनी नवनिर्माण घडवावे : राज ठाकरे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : महाराष्ट्र, मराठवाड्याच्या विकासासाठी काही तरी नवीन करून दाखविण्याची जिद्द असणा-या युवकांनी विकासाचे मुद्दे घेऊन आपल्या सोबत आल्यास त्यांना आपण पदाच्या माध्यमातून संधी देऊ, निवडणुका या गमतीचा विषय नसून, यावेळी जागृत राहून योग्य त्यांना मतदान केल्यासच महाराष्ट्राचा विकास होऊ शकेल असे प्रतिपादन नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांनी केले.
रविवारी त्यांच्या उपस्थितीत येथील गुरूगणेश भवनमध्ये कार्यकर्त्याच्या मेळाव्यात ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक मुद्यांना स्पर्श केल. आजपर्यंत आपण केवळ चुकीच्या मुद्यांभोवती फिरत राहिलो. निवडणुका आल्यावर पैसा, जेवण आणि दारू एवढे मिळाले म्हणजे युवकांनी ती मोज-मजा वाटते. परंतु ही चुकीची धारण बाजूला ठेवा, समाजाच्या राज्याच्या आणि विशेष करून मराठवाड्याच्या विकासासाठी नेमके काय केले पाहिजे हे आधी ठरवा. ते ठरवून हे करणे गरजेचे आहे, याच संदेश मला पाठवा, योग्य त्या प्रस्तावांची आपण जरूर दखल घेऊन त्यानुसार संबंधिताला संधी देऊ असे सांगून ठाकरे म्हणाले की, आरक्षणाच्या मुद्यावरून सरकार राजकारण करत आहे. आरक्षण केवळ शिक्षण आणि नोकरी या दोनच ठिकाणी मिळते. येथे किती कमी संधी आहेत हे आपण जाणून आहात. मात्र त्याची वस्तुनिष्ठ माहिती दिली जात नसल्याने युवकांची दिशाभूल केली जात असल्याचे ते म्हणाले.
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके, गजानन गीते, खटके आदींसह पानसरे, रमेश पाटील आदींची उपस्थिती होती.
मेळाव्यास जिल्हाभरातून नवनिर्माण सेनेचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने हजर होते.
निवडणुका आल्या की, राम मंदिर
निवडणुका आल्या की, भाजपला राम मंदिराचा मुद्दा आठवतो. गेली चार वर्षे बहुमताची सत्ता असताना ते का केले नाही, असा सवाल राज ठाकरे यांनी केला. तसेच हिंदू आणि मुस्लिम समाजात तेढ निर्माण करून दंगल घडवायची आणि त्याचा लाभ मतपेटीसाठी करून घ्यायचा ही भाजपाची रणनिती असल्याचेही ते म्हणाले.

Web Title: Youth should create reform: Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.