अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 11:36 PM2019-02-17T23:36:00+5:302019-02-17T23:36:48+5:30

शहरातील बशीरगंज चौकानजीकच्या एका तरुणाला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली.

Young killed in an unknown vehicle | अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण ठार

Next
ठळक मुद्देबीडच्या बशीरगंज चौकानजीक घडली घटना

बीड : शहरातील बशीरगंज चौकानजीकच्या एका तरुणाला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली.
सोहेल रफीक बागवान (२० रा. बशीरगंज, बीड) असे मयत तरुणाचे नाव आहे. शनिवारी रात्री सोहेल हा बशीरगंज चौकाजवळ थांबलेला होता. रात्री १२ वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने त्यास जोराची धडक दिली. गंभीर मार लागलेल्या सोहेलला परिसरातील नागरिकांनी तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
तिथे त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले. परंतू उपचारा दरम्यान रात्री १ वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, सोहेल यास वाहनाने धडक दिल्याची माहिती काहीजणांनी फोनवरुन त्याचा भाऊ अजिम बागवान यांना दिली. त्यानंतर त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. या प्रकरणी रुग्णालय पोलीस चौकीत नोंद करण्यात आली असून सोहेलला धडक देणाऱ्या वाहनाचा पोलीस शोध घेत आहेत.

Web Title: Young killed in an unknown vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.